स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ…आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत…आपण विधिवत पूजा करत आहोत…आपल्या मनातील भाव तपासून पहा…कुठे तरी अहंकार असणारच..कारण आपण हे सर्व ज्ञान अभ्यास करून मिळवले आहे..ते शुद्ध आहे पण आपले मन ते ग्रहण करू शकत नाही…आता दुसरा एक स्वामीं भक्त आहे..त्याला न कोणता मंत्र माहीत आहे न तंत्र माहीत आहे..पण त्याच्या ह्रदयात स्वामीं भक्ती रुजली आहे..स्वामीं नाम मुखात आहे..तो भोळा भाव धरून फक्त स्वामीं नाम घेत स्वामीं चा अभिषेक करत आहे…मनात कोणताच अहं नाही..आता आपणच विचार करा कुणाचा भक्ती भाव हा खोल असेल…नक्कीच ज्ञान हे भक्तीतून निर्माण झाले तर आपले कल्याण करते..पण केवळ ज्ञान आपले नुकसान करते..थोडक्यात आपणस तंत्र वा मंत्र यात न अडकता..स्वामीं नाम आणि भक्ती यावर कार्य करायचे आहे..इथे एक गोष्ट समजून घ्यावी प्रत्येक पद्धती ही त्या त्या काळा नुसार योग्य च होती..आहे पण आपणस व्यक्तिमत्व विकास करताना आपणस योग्य काय याचा विचार करून..स्वामीं भक्ती वाढवायची आहे…मनात कोणताही अहं न ठेवता..धन्यवाद स्वामीं..!
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4
खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...