देवघर कसे असावे

Nov 8, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

देवघर कसे असावे – खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत… यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि… देव घर कसे असावे… ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते…आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर असावे..आता आपण म्हणाल नक्की देवघर कसे असावे… देव घर हे आपणस आर्थिक दृष्टया जसे परवडेल असे असावे… नक्कीच बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत… त्यातील आपणास आवडणारा… परवडणारा पर्याय आपण निवडावा… देवघरात नेहमी स्वच्छ असे कापडी आसन असावे.. शक्यतो रोज धुतलेले आसन असावे… आता महत्वाचा मुद्दा… देवघरात देव कोणते असावेत.. शास्त्रानुसार पंचायतन असावे… थोडक्यात पाच देव असावेत… जसे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी… हि पाच देव असावेत… शंख.. घंटा असावी… आता काय होते… आपण देवघरात देवांची इतकी गर्दी करतो कि काही दिवसानी आपणस देव घर छोटे वाटू लागते… या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण… कुठे गेलात किंवा कुणी सांगितले कि आणखीन एक देवाची मूर्ती अथवा फोटो घेऊन येतो व आपणस हि कळत नाही आणि मग देव घर लहान पडू लागते… त्या मुळे आज पासून ठरवा कि मी आहे त्याच देवांची व्यस्थित पूजा करेल उगाचच आणखीन देवांच्या मूर्ती अथवा फोटो वाढवत बसणार नाही.. अनेकदा काय होते मूर्ती किंवा फोटो खराब होतात आणि मग काही लोकांच्या सांगण्यावरून त्या मूर्ती अथवा फोटो मंदिरात नेवून ठेवले जातात… आता यावर तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि ठरवा कि हे योग्य आहे कि आयोग्य… नक्की आपण भक्ती करतो कि वेडेपणा… कृपया हि गोष्ट प्रथम बंद करा… आठ दिवस… किंवा महिन्यातून एकदा सर्व देवांना हळद… लिंबू… किंवा दही… किंवा बाजारात अनेक पावडर मिळतात त्याचा वापर करून देवांना स्वच्छ करावे… कारण काय होते वातावरणामुळे किंवा केमिकल युक्त गंधाने मूर्ती खराब होतात त्यामुळे आपण अश्या प्रकारे महिण्यातून एकदा सर्व मूर्ती स्वच्छ करावेत… बघा नक्कीच आपली प्रसन्नता वाढण्यास मदत होईल… आता देवपूजा झाली… रोज देवाला काहीतरी नैवैद्य अर्पण करावा… आपण देवांना अनेक फुले वाहतो… दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य नदीत वा पाण्यात टाकण्याची चुकीची पद्धत आपण करतो… बघा एकीकडे आपण गंगेच्या पाण्याची पूजा करतो आणि दुसरी कडे त्याच गंगा मातेचे पाण्यात घाण टाकतो… अशी कशी आपली श्रद्धा जी आपल्या पर्यावरणाचे नुकसान करत असेल तर… देव कसा प्रसन्न होईल… त्यामुळे आज पासून संकलप करा कि निर्माल्य पाण्यात टाकणार नाही म्हणजे नाहीच.. इथेच आपली निम्मी भगवंताची सेवा रुजू होते व ईश्वर सुद्धा खुश होऊन आशीर्वादच देतो… केवळ देवाला स्नान घातले कि देव पूजा संपते का नाही तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण रुपी भक्ती… पूजा झाली कि रोज किमान ५ मिनिटे कोणत्याही देवाचे नामस्मरण करा … जप करा… बघा आपणस… आपल्या स्वतः मध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसेल… आज आपण इथेच थांबू… पुढील भागात यावर अजून चिंतन मनन करूया… चला तर मग राम कृष्ण हरी.. आपणास माहिती आवडल्यास नककीच आपले चॅनेल subscribe करा इतरांनाही सांगा… धन्यवाद


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...