श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे…सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली, स्मरणशक्ती कमी झाली, महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ लागल्या. …गोंधळून व्यासजी ब्रह्माजींकडे गेले आणि विचारले — “हे पितामह! माझे ज्ञान का हरवत आहे? काहीच सुचत नाही. याचे कारण काय?”ब्रह्माजींनी ध्यान करून सांगितले —“व्यासजी! आपण विद्वत्तेच्या गर्वात आहात..कुठेतरी अहंभाव आला आहे…त्यामुळे हे विस्मरण होत आहे..आपण गणेशस्मरण करा.. ते बुद्धिदाता आहेत..विघ्नहर्ता आहेत…व्यासजी नम्रतेने म्हणाले —“पण प्रभो! मला गणेशांचे स्वरूप माहीत नाही. मार्गदर्शन करा.” ब्रह्माजींनी सांगितले —
“गणेशजी हे परात्पर ब्रह्म आहेत. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र सर्वांत सोपा आणि फलदायी आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ आसनावर बसून, प्राणायाम करून या मंत्राचा जप करा. व्यासजींनी भक्तिभावाने जप सुरू केला. थोड्याच वेळात त्यांचे विस्मरण नाहीसे झाले. ज्ञान पुन्हा प्रकट झाले. आणि पुराणरचनेचे महान कार्य अखंड सुरू झाले.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध खरंतर अध्यात्म म्हणजे… चालती बोलती..पाठशाळा…यातील अनेक कथा या आपल्या जीवनात लागू करण्यासाठी असतात..पण आपण कथा वाचून सोडून देतो..पहा या कथेत व्यासजी यांनी जे काही लिखाण कार्य केलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे..पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आणि त्यांना अडथळा येऊ लागला…पहा आपल्या जीवनात ही आपण ही अनेक कार्य करत असतो…काही दिवसांनी आपल्याला असे वाटते की मी करतो म्हणून होत आहे..खरतर आज आपण जे काही कार्य करत आहोत..ते आपण नाही केलं तरी दुसरे कुणी तरी करणार आहे…उलट जर आपण जर कार्य करत आहोत त्याला एक संधी …मानले… त्या कार्या करायला मिळाले याबद्दल धन्यवाद भाव ठेवला तर..कोणतेही काम कार्य…काम न राहता ती सेवा बनेल..आणि आपल्यातील अहंभाव दूर होऊन आपण उत्कृष्ट असे कार्य करू…कारण अहंभाव आपल्यातील विचार करण्याची शक्ती कमी करतो..सेवाभाव आपली शक्ती वाढवतो…म्हणून प्रत्येक कार्य सेवा भाव ठेवून करूया…धन्यवाद बाप्पा..चला आपण गणपती बाप्पा ला प्रार्थना करूया..
प्रार्थना हे गजानना…अनेकदा आम्ही कार्य करत असताना.. आमच्यात अहंभाव निर्माण होतो..हा अहंभाव ते कार्य करताना जे लक्ष देऊन कार्य करण्याऐवजी..आमचे लक्ष…आमच्यातील अहंभाव यावर केंद्रित होते…कृपा कर..आमच्यातील अहंभाव दूर कर…कारण जे कार्य आम्ही करत आहोत..त्या साठी बुद्धिदाता तूच आहेस..विघ्नहर्ता तूच आहेस..मग मी तर फक्त निमित्त मात्र आहे..कृपा कर… हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!