देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.
देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत?

देवघर – आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे कसे असावे.. खरंतर याचा उत्तर आपण अनेकांची अनेक मत यावर असतात.. मग खरंच प्रश्न निर्माण होतो कि कोणते उत्तर खरे चला आज आजच्या कालानुरूप देव घराचा विचार करू… शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा (ईशान कोपरा) असावे.. पर्यायी दिशा (जर ईशान्य शक्य नसेल तर) पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहेत.. आता हे झाले घरात कुठे असावे याचे उत्तर आता कसे असावे.. याचे साधे आणि सोपे उत्तर आपणस आर्थिक दृष्ट्या परवडणारे.. ज्या देव घरासमोर बसले कि आपले मन शांत होईल असे देव घर असावे.. अनेकदा सांगितले जाते असेच हवे.. तसे नको..पण इथे महत्वाचा विषय आहे.. आपणस आर्थिक दृष्ट्या काय शक्य आहे.. आणि आपल्या मनाला शांती मिळते कि नाही… देवघरात देव कोणते असावेत.. गणपती..कुलदेवी .. कुल देवता टाक .. अन्नपूर्णा .. बाळकृष्ण.. शंख .. घंटा.. इतकेच देव देवघरात असावेत.. आता आपल्या कडे इतरही मूर्ती असतील तर चालतील.. पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा.. अनेकदा काय होते आपण कुठे देवाला गेलो कि मूर्ती आणतो.. फोटो आणतो.. हे शक्य तो टाळा.. कारण काय तर आपणासही देव पूजा करताना सोपे राहील.. आता अनेकदा काय होते काही लोक आपणस सांगतात कि हि मूर्ती नको.. हे देव घरात नको.. आता याबाबत आपणस योग्य तो निर्णय आपण घ्यावा पण एक गोष्ट नक्कीच मनाला खटकते कि कुणी तर सांगते म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो.. ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो.. हे कुठंतरी मनाला पटत नाही.. त्यामुळे हि गोष्ट करताना जे आपणस सल्ला देत आहेत त्यांना योग्य सोलुशन द्याल सांगा.. शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे कि देव घर असे बनवा कि आपल्याला प्रसन्न वाटेल.. आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल.. शेवटी देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर देव आहे चराचरात आहे.. देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देव घर पाहून झाली पाहिजे.. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे विचारा नक्कीच आपण त्यावर विडिओ बनवूया.. धन्यवाद

 

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.
हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.
म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा.
हा काळ तुमच्या उत्कर्षाचा आहे — तो तुमचं कल्याणच करणार आहे.

स्वामी भक्त हो आपण आपल्या चॅनल वर आपले प्रश्न जे आहेत त्यावर चिंतन मनन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याचा उपयोग सर्वांना होणार आहे त्यामुळे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कंमेंट मध्ये मांडू शकता आपण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.. सर्वप्रथम आपले चॅनेल लाईक share आणि सुब्स्क्रिब करा.. आजचा आपला विषय आहे साडेसाती म्हणजे काय ? साडेसाती मध्ये काय करावे.. चला तर मग सुरवात करूया.. साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीवरून साडे-सात वर्षांचा प्रवास (7.5 वर्षे).
यात शनी तीन राशींमध्ये भ्रमण करतो:जन्मराशीच्या आधीची रास (२.५ वर्षे) जन्मराशी (२.५ वर्षे) जन्मराशी नंतरची रास (२.५ वर्षे) म्हणजे एकूण २.५ + २.५ + २.५ = ७.५ वर्षे → म्हणून नाव “साडेसाती”.साडेसाती तेव्हा सुरू होते, जेव्हा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो.
उदा. — जर एखाद्याची जन्मराशी “मकर” असेल, तर शनी धनु राशीत आला की साडेसाती सुरू होते आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर संपते.अनेक लोक साडेसाती आली कि घाबरतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देतात.. पण हा काळ आपल्या उत्कर्षाचा काळ असतो.. शनी देव हे आपल्या कर्माचा हिशोब पाहतात पहा चांगले कर्म असेल तर चांगले फळच मिळेल.. म्हणजेच साडेसाती हा शब्द आपणस सदैव चांगले कर्मच करण्याचा उपदेश करत आहे नाही तर आपण वाईट अश्या परिणामांना सामोरे जावे लागते… म्हणजेच साडेसाती हा आपल्या कर्माचा आरसा आहे.. आता अनेकांना साडेसाती मध्ये दुःख यातना भोगाव्या लागतात पण याच साडेसाती मध्ये आपला उत्कर्ष होत असतो.. पण त्या आपल्याला हि समज असणे आवश्यक आहे कि हि साडेसाती माझे कल्याणच करणार आहे.. हा विश्वास .. श्रद्धा असली पाहिजे.. पहा एखादी गोष्ट वाईट म्हंटल कि आपले वाईटच होते.. जसे आपले विचार तसे आपले जीवन.. साडेसाती मध्ये मन घाबरते खरंतर मनाला सांगा आता तर माझा चांगला काल सुरु झाला आहे.. हो थोडे कष्ट यातना होत आहेत पण या काही वेळे नंतर मला सुखी करणार आहेत.. मला माझ्यात बदल करणे आवश्कयक असेल तो बदल करावा लागेल.. हि तर माझ्या चांगल्या आयुषची सुरवात आहे.. आता मी थांबणार नाही तर लढणार आहेकारण शनिदेव हे माझे कल्याणच करणार आहेत.. आता यात काय करावे.. सर्वप्रथम आपले विचार वर काम करा ते सकारात्मक बनवा.. त्या साठी चांगले पुस्तक वाचा.. शनी देवाला प्रार्थना करा.. शनी मंत्र म्हणा.. मनाला सांगा हा माझ्या उत्कर्षाचा काळ आहे.. जे काही घडतंय, ते माझ्या विकासासाठी घडतंय.” शनी महाराज माझे शत्रू नाहीत तर ते माझे कल्याण करणारे आहेत.. ते माझे उत्कर्ष करत आहेत.. पहा एक विचार किती फरक पडतो.. पहा नक्कीच मार्ग सापडू लागेल.. आज इथे थांबू पुन्हा भेटू नवीन प्रश्न आणि त्यावरील चितनं मनन घेऊन तो पर्यत आपले काही प्रश्न असतील तर पाठवा..द धन्यवाद

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे…सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली, स्मरणशक्ती कमी झाली, महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ लागल्या. …गोंधळून व्यासजी ब्रह्माजींकडे गेले आणि विचारले — “हे पितामह! माझे ज्ञान का हरवत आहे? काहीच सुचत नाही. याचे कारण काय?”ब्रह्माजींनी ध्यान करून सांगितले —“व्यासजी! आपण विद्वत्तेच्या गर्वात आहात..कुठेतरी अहंभाव आला आहे…त्यामुळे हे विस्मरण होत आहे..आपण गणेशस्मरण करा.. ते बुद्धिदाता आहेत..विघ्नहर्ता आहेत…व्यासजी नम्रतेने म्हणाले —“पण प्रभो! मला गणेशांचे स्वरूप माहीत नाही. मार्गदर्शन करा.” ब्रह्माजींनी सांगितले —
“गणेशजी हे परात्पर ब्रह्म आहेत. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र सर्वांत सोपा आणि फलदायी आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ आसनावर बसून, प्राणायाम करून या मंत्राचा जप करा. व्यासजींनी भक्तिभावाने जप सुरू केला. थोड्याच वेळात त्यांचे विस्मरण नाहीसे झाले. ज्ञान पुन्हा प्रकट झाले. आणि पुराणरचनेचे महान कार्य अखंड सुरू झाले.बोला गणपती बाप्पा मोरया..!

बोध खरंतर अध्यात्म म्हणजे… चालती बोलती..पाठशाळा…यातील अनेक कथा या आपल्या जीवनात लागू करण्यासाठी असतात..पण आपण कथा वाचून सोडून देतो..पहा या कथेत व्यासजी यांनी जे काही लिखाण कार्य केलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे..पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आणि त्यांना अडथळा येऊ लागला…पहा आपल्या जीवनात ही आपण ही अनेक कार्य करत असतो…काही दिवसांनी आपल्याला असे वाटते की मी करतो म्हणून होत आहे..खरतर आज आपण जे काही कार्य करत आहोत..ते आपण नाही केलं तरी दुसरे कुणी तरी करणार आहे…उलट जर आपण जर कार्य करत आहोत त्याला एक संधी …मानले… त्या कार्या करायला मिळाले याबद्दल धन्यवाद भाव ठेवला तर..कोणतेही काम कार्य…काम न राहता ती सेवा बनेल..आणि आपल्यातील अहंभाव दूर होऊन आपण उत्कृष्ट असे कार्य करू…कारण अहंभाव आपल्यातील विचार करण्याची शक्ती कमी करतो..सेवाभाव आपली शक्ती वाढवतो…म्हणून प्रत्येक कार्य सेवा भाव ठेवून करूया…धन्यवाद बाप्पा..चला आपण गणपती बाप्पा ला प्रार्थना करूया..

प्रार्थना हे गजानना…अनेकदा आम्ही कार्य करत असताना.. आमच्यात अहंभाव निर्माण होतो..हा अहंभाव ते कार्य करताना जे लक्ष देऊन कार्य करण्याऐवजी..आमचे लक्ष…आमच्यातील अहंभाव यावर केंद्रित होते…कृपा कर..आमच्यातील अहंभाव दूर कर…कारण जे कार्य आम्ही करत आहोत..त्या साठी बुद्धिदाता तूच आहेस..विघ्नहर्ता तूच आहेस..मग मी तर फक्त निमित्त मात्र आहे..कृपा कर… हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला.

महर्षींनी सांगितले की हा रोग त्याच्या पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम आहे — त्या जन्मी तो “कामद” नावाचा व्यापाऱ्याचा मुलगा होता, ज्याने क्रूरपणे निरपराध लोकांची हत्या केली होती, त्यामुळे त्याला शाप मिळाला होता.

महर्षींनी त्याला उपाय सांगितला — गणेशभक्ती. राजा एका जीर्ण गणेश मंदिरात गेला, उपाशी असूनही भक्तिभावाने उपासना करू लागला आणि आपल्या धनाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. यामुळे त्याचे पाप क्षीण झाले.

गणेश उपासनेच्या सामर्थ्याने त्याचे पापरूपी विकराळ रूप त्याच्यापासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले. शेवटी महर्षींच्या कृपेने व गणेशपुराण श्रवणामुळे त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला.

बोध . आपण जे काही करम करतो त्याचे फळ आपणास भोगावेच लागते…पण सत्कर्म करून आपण जी काही चुकीचे कर्म केली असतील..त्याची तीव्रता कमी करू शकतो…राजा असो किंवा अजून कुणी असो..प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाचा लागतो…त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना आपण सावध असणे आवश्यक आहे…अनेकदा आपण चुकीचे कर्म करताना आपणास असे वाटते की मला कुणी पहात नाही…जरी बाहेरचे कुणी पहात नसेल..तरी आपले कर्म हे आपणच पहात असतो..जसे इतरांचे वाईट कर्मावर आपण न पाहता बोट ठेवू शकतो..तर आपणच केलेल्या कर्मा पासून आपली सुटका कशी होईल..म्हणून प्रयत्न करू चांगले कर्म करण्याचे…जरी चुकून वाईट कर्म झाले असेल..तर नक्कीच त्याबद्दल माफी मागा… पहा आपली चूक आपण मान्य करणे हे सुद्धा एक चांगले कर्म आहे..यातून आपण आपली अंतर्गत शुद्धी करतो..पण चूक मान्य करणे ही क्रिया सुद्धा मना पासून असावी…पहा आज आपल्या जीवनात सुख दुःख आहेत…किंवा असणार आहेत..ती आपल्याच कर्माची फळ असणार आहेत..त्यामुळे प्रत्येक कर्म हे विचार पूर्वक करूया…त्या साठी..गणपती बाप्पा कडेच प्रार्थना करूया…! बोला गणपती बाप्पा मोरया..!
प्रार्थना… हे गणपती बाप्पा…आज जी काही सुख किंवा दुःख आमच्या जीवनात आहेत..ती आमच्या कर्माचीच फळे आहेत…आज राजा
सोमकांत याची गोष्टीला निमित्ताने तू आम्हाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते याची जाणीव करून दिलीस त्याबद्दल धन्यवाद…आम्हाला प्रत्येक कर्म करताना या नियमाची आठवण असू दे..आम्ही हे विसरणारच..पण तू तर बुद्धी दाता आहेस…आम्हाला सदैव जागृत अवस्थेत कर्म करून घे…चुकीचे कर्म करण्यापूर्वी आम्हाला त्या कर्माची जाणीव करून दे… चांगल्या कर्मा साठी आम्हाला तयार कर.. हे तुझ्या कृपे शिवाय शक्य नाही…सदैव कृपा कर…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला
एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?”
शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.”
सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते लहान मूषक.गणेशजींनी मनाशी विचार केला –“विश्व म्हणजेच आईवडील. त्यांच्या प्रदक्षिणेनेच संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते.”आणि त्यांनी आई-पित्याची प्रदक्षिणा केली.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध:वरील कथा ही खरंतर आपल्यासाठी आहे पहा..जसे गणपती बाप्पा चे वाहन मूषक आहे..वाहन छोटे पण महत्त्वाचे आहे..आपल्या जीवनात ही अनेकदा अनेक लहान लहान गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण आपल्या कडे जे आहे ते न पहाता..म्हणतो माझ्याकडे एवढेच आहे…जसे माझ्या कडे सायकल आहे…गाडी नाही..पण आपण आपण आपल्या कडे जे आहे त्यातून खूप काही करू शकतो..फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे…बाप्पा नी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली…म्हणजेच काय आपले आद्य कर्तव्य या ठिकाणी बाप्पा सांगत आहेत..आधी आपली आई..वडिलांची सेवा करा..तोच धर्म आहे..तोच कल्याणाचा मार्ग आहे…इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो…प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी केवळ बाह्य परिस्थितीकडे पाहू नये; योग्य विचार महत्त्वाचा आहे….बोला गणपती बाप्पा मोरया…चला बाप्पा ला प्रार्थना करूया…
प्रार्थना..हे गणपती बाप्पा..तू माता पिता यांना प्रदक्षिणा घालून विश्व प्रदक्षिणा करून आम्हाला आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले आहेस..मात्र आम्ही इतर सर्व करतो…पण आई वडिलांची सेवाच विसरतो… आमच्या वर कृपा कर..आणि आमच्याकडून आई वडिलांची सेवा घडू दे… आमच्या मुळे त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत…आमच्यातील सेवा भाव इतका दृढ कर की..आमची मातृ पितृ सेवा पाहून…इतरांनाही प्रेरणा मिळेल…कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात नसतील…ही बुद्धी सर्वांना दे..कारण तुझ्या कृपेने हे शक्य आहे…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..! बोला गणपती बाप्पा मोरया..!
www.chetnakeswar.com