कथा १ – गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक वाढवेल.” सूतजींना ही विनंती अतिशय भावली. ते म्हणाले — शौनकजी! आज मी तुम्हाला त्या देवतेची कथा सांगणार आहे, ज्यांच्यापासून सर्व ज्ञान आणि सर्व मंगलारंभ होतात — श्रीगणेशांची! आणि प्रथम त्यांनी प्रार्थना केली —नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने । येन अगस्त्यसमः साक्षात् विघ्नसागर शोषणे
बोध – भक्ती आणि श्रद्धेतून निर्माण झालेली शक्तीच आपले रक्षण करते. आणि प्रत्येक कार्याचा आरंभ श्रीगणेशांच्या स्मरणानेच केल्यास यश निश्चित होते.
बोध – वरील कथा आपणस काय सांगत आहे सतत ज्ञानयज्ञ करायला हवा म्हणजे आपणस सतत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा.. कोणतेही ज्ञान आपणस तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपल्यात शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल.. श्रद्धा आणि भक्ती आपल्याला मानसिक स्थैर्य देतात. जेव्हा मन गोंधळलेले असते, तेव्हा शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या ध्येयाचे स्मरण करा.
प्रार्थना – हे गणपती बाप्पा आमच्या जीवनात ज्ञान यज्ञ येऊ दे.. सतत काही तरी नवीन शिकणायची सवय आमच्यात निर्माण कर.. तूच तर बुद्धिदायक आहेस.. आम्हाला सतत नवीनशिकण्याची बुद्धी प्रदान कर.. हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. कृपा कर.. धन्यवाद हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला गणपती बाप्पा मोरया