खरा होई जागा श्रद्धे सहित – आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे…असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते… पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि… आपण स्वामींचे सेवेकरी आहोत… कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते संकटा विषयी आणि आपल्या अंतर्मनातील श्रद्धे ची जागा भीती नि घेतली असते… त्यामुळे आपल्या मधील श्रद्धा भाव कमी होतो… हि श्रद्धा कमी होऊ नये या साठी आपणस स्वामी नामाची कास धरायची आहे… आणि आपल्या अंतर्मनात श्रद्धा भाव पोहोचवायचा आहे.
कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त
– मनात नाही भाव आणि स्वामी मला पाव… असे कसे होईल… फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत असे म्हणून.. आपण स्वामींचे सेवेकरी होणार आहोत का ? नाही त्या साठी आपणस आपल्यातील श्रद्धा हा गुण वाढवायचा आहे… आता हा गुण कसा वाढेल… सोपे आहे… रोज एक तरी स्वामी लीला वाचावी… त्यावर स्वतः चिंतन … मनन करावे… रोज किमान ५ मिनिटे स्वामी नाम जप रुपी सेवा करावी.. पहा नककीच आपली श्रद्धा वाढेल… आणि आपल्या अंतर्मनातून आवाज येईल मी स्वामींचा बाळ आहे .. आता भीतीचे काय कारण .
किती दा दिला बोल त्यानीच हाथ– आज पर्यंत आपणस अनेकदा संकट.. दुःख आली… आपणस त्यातुन कुणी वाचवले… स्वामींनी च वाचवले ना.. मग आज जेव्हा संकट आले आहे तेव्हा आपले मन का बरे विसरले आहे..आपले मन हे विसरल्यामुळे काय होते.. आपणस आपले दुःख मोठे वाटू लागते आणि सर्व मार्ग आपणस बंद दिसतात… या मुळे संकट आले कि सर्वप्रथम मनास सांगा… हे संकट नसून मला शिकण्याची संधी आहे… कारण यातून बाहेर तर मी सहजच पडणार आहे… कारण स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत.. आज पर्यंत त्यांनीच तर मला हाथ दिला आहे… आणि स्वामींनी एकदा हाथ धरला कि ते सोडत नाहीत.
नको डग मगू स्वामी देतील साथ– हे मना तू डगमगू नकोस… कारण आज पर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांनी साथ दिली आहे… आपले मन डगमगले कि आपले होणारे काम होत नाही… आणि आपला एक नकारात्मक विचार…आपले यश आपल्या पासून दूर नेऊ शकते… त्यामुळे न डगमगता संकटांना सांगा… स्वामी महाराजांची साथ माझ्या सोबत आहे… डगमगू नकोस… भिऊ नकोस.