श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

Nov 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

उगाचि भितोसी भय हे पळू दे – आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते… उद्या काय होईल… माझे अमुक काम होईल कि नाही… आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते… उद्या काय होईल याची… कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार डोकावतात… या मनाला विचारांना आपणस सांगायचे आहे… अरे भिऊ नकोस ब्रम्हांड नायक आपल्या सोबत आहेत!

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे – अरे मना तुझ्या जवळ अफाट अशी शक्ती आहे… स्वामी नामाची शक्ती… ती शक्ती आहे आहे आपल्या अंतकरणात आहे… आपल्या आतील आवाज अनेकदा आपणस सांगत असतो स्वामी महाराज आहेत भिऊ नकोस.. पण आपले नकरात्मक विचार मध्ये येत असतात… आपणास आंतरिक शक्तीस जागृत करायचे आहे… त्या शक्ती ची अनुभूती घ्यायची आहे.

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा – या संपूर्ण जीव सृष्टी च्या जन्म व मृत्यूची जी दोरी आहे ती… स्वामी महाराजांच्या हाती आहे… कुणाचा जन्म कधी होईल… शेवटचा श्वास कधी याचे संपूर्ण नियोजन हे स्वामी महाराजांच्या कडे आहे… थोडक्यात झाडाचं पण सुद्धा ज्यांच्या सत्ते ने हालते… अश्या ब्रम्हांड नायकाचे आपणस सेवक आहोत… एकदा का स्वामींच्या हाती आपला हात समर्पित केला कि मग.. प्रत्येक दिवस कसा स्वामीमय बनतो… पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि आपले दुखत आहे आणि आपण म्हणाल मी काहीच करणार नाही… आपणास डॉक्टर कडे जावे लागेल.. त्याच्या नियमांचे पालन करावेच लागेल.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा – हे मना तू घाबरू नकोस… तू स्वामीचा बाळ आहेस… जसे आपले आई वडील आपली काळजी घेतात तसेच स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात… बघा एखादे लहान मुलं.. आपल्या आई च्या किंवा वडिलांच्या खांद्यावर बसते तेवहा त्यास खात्री असते… आपणस आपले वडील पडू देणार नाहीत… त्या मुले त्याच्या मनात कोणतीही भय नसते… ते घाबरत नाही… तशीच दृढ श्रद्धा आणि विश्वास आपणस आपल्यात निर्माण करायचा आहे… आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास आपणस आपल्या अंतकरणात निर्माण दृढ करायचा आहे.

 


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...