!!श्री स्वामी समर्थ!!
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,!
www.chetnakeswar.comस्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही सुद्धा हरीचे वर्णन करतात..पहा आपण अनेक ग्रंथ वाचतो…त्याची पारायणे करतो..पण त्यावर विचार करत नाही..आपण फक्त कथा किंवा गोष्टी यातच अडकतो..किंवा त्यावर चर्चा करतो..पण ते ग्रँथ हे आपले गुरू असतात..ते आपल्याशी बोलतात पण आपण त्यावर विचार करत नाही..त्यामुळे ते फक्त वाचन होते..जर आपण यातून सार काढला व त्या नुसार कार्य केले तर.. नक्कीच यशस्वी जीवन होईल..आपण किती वाचतो.. या पेक्षा आपणस काय बोध होतो..हे महत्वाचे… वरील ओवीतून माऊली स्पष्टपणे सांगत आहेत..काहीही जरी आपण वाचले तरी त्यात..हरी चे वर्णन आहे..म्हणजेच नामाची महती आहे..पण आपण नाम सेवा सोडून इतर सेवेत अडकतो..म्हणून माउली पुन्हा सांगत आहेत…नाम घ्या…नाम..कोणतंही घ्या.. फक्त रोज न चुकता घ्या..पहा अनुभूती घेऊन..चला रोज किमान १ माळ स्वामीं नाम घेऊया…धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4
खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...