स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर…देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म आहेत..म्हणजेच.. इथे स्वामीं आपणस तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत..आपले काय होते..ही देवता वेगळी..हा देव वेगळा…असे काही नाही..प्रत्येक देवात स्वामीं आहेत.. स्वामीं मध्ये प्रत्येक देव आहे.. म्हणजेच.. देवत्व एकच आहे.. आपणच त्याला विविध नावे देतो..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी दत्त म्हणेल..कुणी विष्णू म्हणेल..स्वामीच आहेत सर्वत्र..फक्त या ठिकाणी आपली समज कशी आहे..यावर सर्व अवलंबून आहे..म्हणजेच स्वामीं इथे आपणस स्वामीं तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत…कारण तुलना आली की भक्ती मध्ये भाव उतरणार नाही..भाव नसेल तर भक्ती कशी होणार.. हे समर्था आमच्यातील तुलनात्मक भक्ती दूर कर..सर्वत्र तूच आहेस ही समज दे..तुझ्या नामात दंग कर..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद
आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी
श्री समर्थ रामदास स्वामी दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......