बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते… आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले … त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्हाला गरज वाटत असेल तर मालिनी यांच्या घरातून झुणका आणि भाकरी घेऊन या असे महाराजांनी सांगितल्यावर पितांबर झुणका भाकर घेऊन आला ती झुणका भाकरी महाराजांनी खाल्ली आणि पितांबरला ते म्हणाले की हा मटका घेऊन जा आणि त्या नदीतून पाणी घेऊन ये.. तर पितांबर त्यांना म्हणाला की महाराज तेथे पाणी खूप कमी आहे आणि त्या पाण्यातून खूप वास येत आहे तुमची परवानगी असेल तर मी दुसऱ्या ठिकाणावरून चांगले म्हणजे शुद्ध पाणी घेऊन येतो त्यावर श्री महाराज म्हणाले की त्या ठिकाणावरूनच पाणी आण आणि पाणी हाताने नको भरू मटक्यानेच पाणी भर त्यानंतर श्री महाराजांची आज्ञा अनुसरून पितांबर तेथे गेले.. तेथे गेल्यानंतर त्यांनी बघितले की पाणी तर हाथानेच भरण्यासारखे आहे पण महाराजांची आज्ञा होती म्हणून त्या अनुसार त्यांनी मटका पाणी भरण्यासाठी नदी मध्ये बुडवला त्यावेळी चमत्कार झाला मटका तर भरला पण त्या ठिकाणी त्या नदीमध्ये भरपूर पाणी आले आणि ते पाणी पण खूप शुद्ध होते की त्या मध्ये आपला चेहरा दिसेल हे सर्व पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज यांचा जयजयकार असो.
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध
वरील लीलेच्या माध्यमातून आपणास श्री महाराज अनेक बोध देत आहे तसे पहिला गेले तर प्रत्येक लिलेचा बोध वेगळा असेलच परंतु श्री महाराज आपल्याला वेगवेगळा बोध देतात येथे श्री महाराज यांना बंकटलाल आणि पितांबर यांनी विचारले की तुमच्या साठी जेवण घेऊन येऊ का ?तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन… येथे महाराज सांगतात की तुम्ही ज्या देवाची सेवा करतात ती कशासाठी ?तर ती तुमच्यासाठी परंतु आपण म्हणतो की मी देवाची सेवा केली आणि हीच चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून श्री महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन म्हणजेच देवाची ची सेवा करा श्री महाराज यांनी सांगितले की झुणका भाकरी घेऊन या पहा येथे श्री महाराज आपल्यला सांगतात की भाकरीच्या पिठासारखे मऊ आणि चटणी सारखे कणखर बना तरच आपले जीवन आनंदमय होईल.. येथे पितांबर च्या कृतीतून आपल्याला कळते की गुरूच्या आज्ञेचे पालन कश्या प्रकारे केले पाहिजे मनात कोणत्याही प्रकारे शंका न घेता गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याच श्रद्धेचे फळ म्हणजे त्यांना स्वच्छ म्हणजे शुद्ध पाणी प्राप्त झाले ह्याच्यावर आपण मनन चिंतन करू या
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||