भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

Nov 28, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा – नामाचा महिमा अगाध आहे… खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून श्रीलंकेत जायचे होते… जाण्यासाठी मार्ग होता समुद्र मार्ग… इतके अंतर जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता..आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला… मग वानर सेनेनं समुदात दगडे टाकण्यास सुरवात केली… परंतु किती दगडे टाकली तरी ती सर्व पाण्यात जाऊन खाली बसत होती… आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला.. तितक्यात पवन पुत्र श्री हनुमान यांच्या ह्रद्यातून विचार आला कि आपण दगडावर “श्री राम” लिहून दगड पाण्यात टाकावा.. असा विचार करून त्यांनी दगड पाण्यात टाकला असता तो दगड पाण्यावर तरंगू लागला.. हे पाहून सर्व वानर सेनेने… “श्री राम” हा मंत्र लिहून पाण्यात दगडे टाकण्यास सुरवात केली… ती सर्व दगडे पाण्यावर तरंगू लागली.. रस्ता तयार होऊ लागला… हे सर्व पाहून प्रभू श्री रामचंद्राना देखील वाटले आपण सुद्धा श्री राम लिहून दगड पाण्यात टाकावा… त्यानी सुद्धा पाण्यात दगड टाकला.. पण तो दगड पाण्यात बुडला… हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.. तेव्हा पवन पुत्र हनुमान म्हणाले… स्वामी आपण टाकलेले दगड नाही तरणांर कारण… आपण ज्याला धरता तो भवसागर पार होतो.. पण आपण ज्याला सोडता तो हा भावसागर तरु शकत नाही … म्हणजेच ज्याच्या मुखात नाम आहे तो या भवसागरात तरतोच… अश्या रीतीने राम नामाने श्री राम सेतूची निर्मिती झाली… तश्याच सेतू ची निर्मिती आपल्या जीवनात होईल जेव्हा आपण नाम रुपी साधना सातत्याने करू … हा आहे नाम महिमा.

चला तर मग आपण पवनसूत हनुमंतालाच प्रार्थना करूया… हे पवनसुता… आपली श्री राम नामावर इतकी श्रद्धा होती कि… आपण राम नामाचा मार्ग रुपी सेतू निर्माण केलात.. ज्या प्रमाणे आपल्या मुखात अखंड राम नाम होते… त्या प्रमाणे आमच्या मुखात भगवंताचे नाम यावे… नाम महिमा आम्हाला समजावा.. आमच्या ह्रद्यातून नामच यावे… आणि हृदयातील भगवंताची आम्हला ओळख व्हावी… हे पवन सुता हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...