मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

Nov 21, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे… आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत… समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन केले आहे… इथे मला जे समजले… आणि मला त्यातील काही गुणांवर स्वतः काम करणे आवश्यक वाटले ते इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयन्त करत आहे… रामदास स्वामी म्हणतात मूर्खांचे डॉ प्रकार असतात.. मूर्ख जो शिकलेला नाही व दुसरा शिकलेला मूर्ख… जन्माला जयाचे उदरी । तयासी विरोध करी -पहा आपले आई वडील आहे आपणस आपल्याभल्याच्या गोष्टी सांगत असतात… कारण कोणत्याही आई वडिलांस वाटते का आपल्या मुलाचे व मुलीचे वाईट व्हावे पण.. अनेकदा आपण त्यांच्या चांगल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो… खरंतर त्यांचा जो सल्ला असतो तो अनुभवाचा असतो… जो कोणत्याही शाळेत वा युनिव्हर्सिटी मध्ये प्राप्त होऊ शकत नाही पण… या ठिकाणी आपल्यातील मूर्ख पण आडवा येतो आणि… अनेकदा आपणस नंतर कळते कि आपण त्यांचा सल्ला न ऐकून कसा मूर्खपणा केला आहे. आपली आपण करी स्तुती । स्वदेशी भोगी विपत्त्ती । सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख । अनेकदा आपण आपल्या स्वतःची च स्तुती करतो… मी हे केले… मी ते केले… माझ्या मुळेच हे काम झाले… किंवा अनेकदा आपण आपलीच बढाई मारतो… समोरचा व्यक्ती आपली स्व स्तुती ऐकून मनात हसत असतो… तोही आपल्या हा ला हा मिळवत असतो… आणि आपणास वाटते कि मी किती मोठा आहे.. म्हणजेच स्वतःच स्वतःला मूर्ख बनवत असतो… अनेकदा आपण आपल्या पूर्वजांची स्तुती करतो… पूर्वजांची स्तुति करावी यांस काही हरकत नाही पण… आमचे पूर्वज अमुक होत… ते इतके थोर होते… हेच फक्त आपण लोकांना सांगतो.. पण त्या पूर्वजांच्या कर्तुत्वाला शोभेल असे आपले कर्तृत्व काय तर शून्य… मग हा मूर्खपणा नाही का?
औषध ने घे असोनि वेथा । पथ्य न करी सर्वथा । आपणस एखादा आजार आहे तरी देखील डॉक्टरांचा सल्ला न घेणे… आपला आजार लपवून ठेवणे… तसेच अनेकदा डॉक्टर काही पथ्य सांगतात पण ती आपण पाळत नाहीत… या सारखा मूर्खपणा तो काय ? भगवंताने आपणस इतके चांगले शरीर दिले आहे… त्याची काळजी कोण घेणार… आपणच ना… भगवंताने अपील शरीर इतके सुंदर बनवले आहे कि कोणताही रोग आजार… होण्यापूर्वी ते आपणस पूर्व सूचना देत असते.. जर आपण त्या कडे दुर्लक्ष केले नाही.. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर पुढील अनेक अवघड गोष्टी आपण टाळू शकतो पण… अनेकदा आपण आजार अंगावर काढतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपणास व आपल्या परिवारास भोगावे लागतात… मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो.. हा मूर्खपणा नाही तर मग काय आहे.

घरच्यावरी खाय दाढ । बाहेरी दिन बापुडा । ऐसा जो का वेड मूढा । तो एक मूर्ख – अनेकदा आपल्या कडून घरातील व्यक्तीवर चिडचिड होते… आपण विनाकारण त्याच्यावर चीडचीड करतो… पण बाहेर गेलो कि आपल्या मुखात साखर असते… बाहेरील लोक म्हणतात यांच्या सारखा सु स्वभावी माणूस नाही… पण घरातील माणसे म्हणतात आमचा हा म्हणजे मूर्ख माणूस आहे…कारण नसताना चिडचिड करत असतो… आमचे काही एक ऐकत नाही… मग अनेकदा आपण म्हणतो कि त्याचा स्वभाव तसा आहे… आता आपण स्वतः विचार करा ज्या आवाजात आपण घरच्यांवर चिडतो … रागावतो.. त्याच आवाजात आपण जिथे नोकरी करता तिथे बोलू शकतो का… आपण आपल्या बॉस शी तसे बोलू शकतो का? नाही ना … कारण आपणस माहित आहे जर आपण तसे केले तर नोकरी जाईल… हे व्यवसाय करणाऱ्यास पण लागू होते… ग्राहकाशी गोड गोड बोलता मग तसे घरी का नाही बोलू शकत ?

स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार । करी थोडे बोले फार । तो एक मूर्ख – कधीही कुना काही मदत करत नाही … दुसऱ्याने मदत केली तर त्याची जाण ठेवत नाही… आणि थोडी फार जरी कुणाला मदत केली तर त्याचा गाजावाजा जास्त करतो… पहा ना अनेकदा आपण दुसऱ्याला मदत करू शकतो तरी आपण करत नाही… हि मदत काय फक्त आर्थिक असते असे आहे का नाही ती इतरही असू शकते पण ती सुद्धा आपण करत नाही… कायम आपण फक्त आपलाच विचार करतो.. आपणस अडचण असताना अनेकदा अनेक लोक आपल्याला मदत करत असतात.. पण त्याच्या त्या मदतीची आपण जाणीव ठेवत नाही…आता समजा आपणस एखादयाने मदत केली… पुढे एखादी अडचण आपणस आली तर आपण पुन्हा त्या व्यक्ती कडे जातो… तेव्हा त्याची सुद्धा अडचण असते तो मदत करत नाही पण मग तेव्हा आपण त्याच्यावर राग धरतो वा त्याला अपशब्द बोलतो… हे योग्य आहे का ? अनेकदा आपण दुसऱ्याला मदत करतो थोडी पण गाजावाज़ा इतकं करतो कि जसे आपण आपली संपत्ती त्याच्या नावे केली असावी.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण एखाद्य गरिबाला काही मदत करतो तेव्हा त्याचे सह फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो… खरंच मदत करतो का .. दिखाऊपणा मग हा मूर्खपणा नाही का ?

जैसें जैसें करावे । तैसें तैसें पावावें । हे जयास नेणवे । तो एक मूर्ख – कर्माचा सिद्धांत आहे कि आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते.. पण अनेकदा आपणस याचा विसर पडतो… अनेकदा आपण चुकीचे कर्म करतो आणि ते विसरून जातो… आपला स्वभाव असं असतो कि आपण आपले वाईट कर्म लगेचच विसरतो आपणस ते कधीच चुकीचे वाटत नाही… मग आपणस भविष्यात कधी तरी वाईट परिणाम भोगावे लागतात… मग तेव्हा आपण आपसूकपणे म्हणतो मी तरी कधीच कुणाचे वाईट केले नाही तरी मला असे दुःख की भोगावे लागत आहे… कर्म फक्त कृतीतून होत नाही तर आपल्या विचारातून सुद्धा होत असते… आणि सृष्टीचा नियम आहे आपल्या प्रत्येक कृतीचे फळ हे आपणास पार्ट मिळत असते… या सर्व गोष्टीचा विचार करून आपण प्रत्येक कर्म करताना जागृत राहून कर्म करणे आवश्यक आहे… नाही तर तो आपला मूर्खपणाच ठरणार आहे.

दोघे बोलत असती जेथें ।तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख। अनेकदा आपण हि चूक करतो दोन व्यक्ती बोलत असतात… आपणही तिथे जात्तो… त्याचा काही तरी महत्वपूर्ण असा विषय सुरु असतो आणि आपण अचानक तिथे जातो… तखडे वाक्य लय कानावर पडते आणि त्या वरून आपण आपले मत मांडतो… त्यानी आपले मत मागितले नसते… तरी आपण आपले मत मांडत असतो.. तसेच अनेकदा आपणस त्या विषयाचे पूर्ण माहिती पण नसते पण आपण अपील मत मांडत असतो… व आपले म्हणणे कसे बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयन्त करत असतो. खरंतर हि एक वाईट सवय तर आहेच म्हणजेच हा अपा मूर्खपणा आहे.

कलह पाहता उभा राहे । तोडविना कौतुके पाहे । खरे असता खोटें साहे । तो की मूर्ख – अनेकदा दोन व्यक्तीचे भांडण सुरु असतात.. त्या व्यक्तींना आपण ओळखत नसतो पण एक विरंगुळा म्हणून आपण त्याचे भांडण पाहत असतो… अनेक महाशय असे असतात कि मोबाइलला मध्ये विडिओ शूट करतात.. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही कि बुवा आपण हे भांडण सोडवू शकतो… उलट भांडण बघून म्हणतात किती मूर्ख आहेत … अरे ते मुख आहेत म्हून भांडत आहेत पण त्याच्या पेक्षा तू किती मूर्ख आहेस त्याचे भांडण भागात बसला आहेस… अनेकदा आपणस माहित असते कि अमुक एकदा व्यक्तीची काही चूक नाही तरी पण आपण त्या व्यक्तीची बाजू न घेत जो शक्तीशाली आहे त्याची आपण बाजू घेतो.. म्हणजेच भांडण सोडवणं तर सोडून द्या उलट ते भांडण कसे वाढेल अशी कृती आपण करतो … हा मूर्ख पण नाही का?

कलह पाहता उभा राहे । तोडविना कौतुके पाहे । खरे असता खोटें साहे । तो की मूर्ख – अनेकदा दोन व्यक्तीचे भांडण सुरु असतात.. त्या व्यक्तींना आपण ओळखत नसतो पण एक विरंगुळा म्हणून आपण त्याचे भांडण पाहत असतो… अनेक महाशय असे असतात कि मोबाइलला मध्ये विडिओ शूट करतात.. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही कि बुवा आपण हे भांडण सोडवू शकतो… उलट भांडण बघून म्हणतात किती मूर्ख आहेत … अरे ते मुख आहेत म्हून भांडत आहेत पण त्याच्या पेक्षा तू किती मूर्ख आहेस त्याचे भांडण भागात बसला आहेस… अनेकदा आपणस माहित असते कि अमुक एकदा व्यक्तीची काही चूक नाही तरी पण आपण त्या व्यक्तीची बाजू न घेत जो शक्तीशाली आहे त्याची आपण बाजू घेतो.. म्हणजेच भांडण सोडवणं तर सोडून द्या उलट ते भांडण कसे वाढेल अशी कृती आपण करतो … हा मूर्ख पण नाही का?

आपण वाचीना कधी । कोणास वाचावया नेदी बांधोन ठेवी बंदी । तो एक मूर्ख – आपण लहान पण पशूं एक म्हण ऐकली आहे ती म्हणजे – वाचेल तो टिकेल.. खरंतर आपल्याकडे समृद्ध असे साहित्य उपलब्ध आहे… इतके साहित्य आहे कि आपले आयुष्य कमी पडेल… पण शाळा… कॉलेज संपल्यावर आपली वाचण्याची सवय पूर्णपणे बंद होते.. खरंतर वाचन हा प्ले बुद्धीचा खुराक आहे… काय वाचावे हे पण समजे पाहिजे… जर आपण नकारात्मक वाचत असाल व म्हणलं कि इतके वाचतो तरी आमच्यात काही बदल होत नाही… अहो आपण किती या पेक्षा महत्वाचे आपण काय वाचतो… तसेच आपण जे काही चांगले वाचत असू ते पुस्तके इतरांना द्यावी… अनेकदा आपण धार्मिक ग्रंथ बांधून ठेवतो… संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्या प्रमाणे आपण त्या ग्रंथाच्या एका तरी ओवीचे चिंतन मनन आपण रोज केले पाहिजे हीच तर खरी भक्ती आणि श्रद्धे ची प्रथम पायरी नाही का .

चला आपण रामदास स्वामींना प्रार्थना करूया – स्वामी आपण तर ग्रंथ रूपाने मूर्खांचे अनेक लक्षण सांगितले आहेत… आम्ही ते लक्षण वाचतो… आम्हाला वाचताना असे वाटते कि.. हि सर्व लक्षण मूर्खांचे आहेत.. पण आम्ही यावर कधीच विचार करत नाहीत कि.. आमच्यात यातील किती लक्षणे आहेत… आम्ही आपणस प्रार्थना करतो कि आम्हला आमच्यातील मूर्ख पणाच्या लक्षणांचे दर्शन घडव.. आम्हाला त्यावर काम करण्याची प्रेरणा दे… तुझ्या कृपेशिवाय हे शक्य नाही … समर्था हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !

 

 


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...