श्री दासबोध दशक १२ समास १

Jul 9, 2022 | मराठी

Share

श्री दासबोध दशक १२ समास १

दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत… प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही… रामदास स्वामी अश्या लोकांसाठी सांगतात कि आधी प्रपंच व्यवस्थित करा आणि मग परमार्थ कडे वळावे इथे आळस करू नये… जर आपण
प्रपंच सोडून परमार्थ कराल तर आपणस कष्ट.. दुःख.. यातना भोगाव्या लागतील म्हणजेच दोन्ही व्यवस्थित होणार नाही… म्हणून समर्थ म्हणतात कि जर आपण प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालाल तर आपण विवेकी आहोत… अनेक जण प्रपंच सोडून परमार्थ करतात मंग त्या माणसाला प्रथम अन्न खाण्यास मिळत नाही म्हणजेच अन्न मिळत नाही.. जर आपले पोटच भरले नसेल तर आपले लक्ष प्रपंच आणि परमार्थात कसे लागेल ? यावर खरे आहे कि नाही म्हणून प्रपंच सोडू नये… काही जण म्हणतात आम्ही फक्त प्रपंच करणार.. मग काय होते अनेक अडचणी येतात… मग आपणस काय करावे हेच समजत नाही म्हणजेच अनेक कष्ट यातना होतात .. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ याची आपणस सांगड घालायची आहे… एखादा मनुष्य आहे तो जर काम धंदा सोडून घरीच बसला तर त्याचे घर कसे चालेल सांगा त्याचा परिणाम काय होईल घरात आहे नाही ते सर्व संपेल व एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल.. अशीच अवस्था प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड नाही घातली तर होते… थोडक्यात आपणस प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची अनुभूती घ्याची आहे… आपण फक्त पारमार्थिक माणसाचं योगी म्हणतो पण रामदास स्वामी खरा योगी जो परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालतो त्यास म्हणतात.. इथे रामदास स्वामी सांगत आहे कि आपणस सांगत आहेत आपणस प्रपंच सावधपणे करायचा आहे जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ याची सांगड बसेल… रामदास स्वामी म्हणतात कि जो प्रपंच व्यवस्थित करत नाही तो परमार्थ हि खोटेपणाने करतो…प्राणी, पक्षी कीटक सुद्धा विचारपूर्वक जीवन जगतात आपण तर मनुष्य आहोत मग आपण सुद्धा सारासार विचार करून प्रपंच करावा थोडक्यात आपले वागणे विवेक रुपी असावे… आपणात दूरदृष्टी असावी… आपणास सुखी व्हायचे आहे तर आपणस नेहमी सावध असणे आवश्यक आहे… थोडकयात प्रत्येक समस्येत चारही बाजूनी विचार करून आपण निर्णय घेतला तर प्रपंचातील सर्व गोष्टी छानच होतील.. आपण सारासार विचार ना करता निर्णय घेतला व तो निर्णय चुकला कि नंतर रडून काय उपयोग त्यासाठी आधीच आपण शहाणपण शिकावे इतरांकडून हि शिकावे.. तसेच आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपल्यात काय अवगुण आहेत याची एक यादी बनवावी आणि एक एक अवगुण काढून टाकावेत जेणेकरून चित्त शुद्धी होईल.. भलेही आपण बाहेरून विचित्र दिसत असू आतून मात्र आपण शुद्ध असणे आवश्यक आहे हीच आध्यात्माची सुरवात आहे.. लोकांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करावे मात्र त्यांच्यात कोणते चांगले गुण आहेत ते वेचून घ्यावेत जेणेकरून आपले शरीर मन सत्व गुणांची खाण बनेल … अनेकदा आपण लोकांचे मन दुखावतो हे टाळावे कारण यातून राग द्वेष निर्माण होतो जो आपल्या परमार्थात बाधा निर्माण करतो… थोडकयात प्रपंचात राहून चित्त शुद्ध करून परमार्थ मार्गावर अग्रेसर होण्यास समर्थ आपणस सांगत आहेत.

चला आपण समर्थाना प्रार्थना करूया – हे समर्था आज तू जो दासबोधातून बोध देत आहेस त्यावर काम करण्याची प्रेरणा आम्हाला दे… आज पर्यंत आम्हाला वाटत होते.. प्रपंच सोडूनच परमार्थ होतो पण आजच्या दासबोधातून आम्हाला तू सांगितलंस कि.. जो प्रपंच नीट करतो तोच परमार्थ व्यवस्थित करू शकतो.. आम्हाला आमच्यातील अवगुण दाखव… इतरांमधील फक्त गुणच दिसू दे.. चांगले ते घेण्याची वृत्ती आमच्यात विकसित कर.. आम्हाला शुद्ध कर.. कारण जो पर्यंत आम्ही शुद्ध होत नाही तो पर्यंत आम्ही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालू शकत नाही… प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याची प्रेरणा आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.. आमच्यकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !! WWW.CHETNAKESWAR.COM


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...