श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 27, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेगांव चा बाजाराचा दिवस होता. त्या बाजारात अनेक पिंपळगावातील मंडळी गेली होती. त्याच बाजारात श्री बंकटलाल देखील आले होते. त्या दिवशी बाजारात अनेक लोकांच्या बोलण्यात येत होते कि आमच्या पिंपळगावात एक अवलिया आले आहेत. हा हा म्हणता हि बातमी संपूर्ण बाजारात पसरली. बंकटलाल यांच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांना मनातून खात्री वाटली कि नक्कीच ते आपले श्री गजानन महाराजच असणार. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पत्नी सहित पिंपळगाव गाठले. पाहतो तर काय साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजच होते. मग काय त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांनी महाराजांना वंदन केले. महाराज आपण आता येतो म्हणून गेलात.. आज पंधरा दिवस झाले महाराज… आमचे काही चुकले काय .. महाराज तुमच्या विना शेगांव भणभणीत दिसत आहे.. सर्व सेवेकरी आपली वाट पहात आहेत.. बैल गाडी आणली आहे.. आपणस विनंती आहे.. आपण शेगांवास चलावे… माय लेकांची ताटातूट होणे बरे नव्हें… अनेक भक्त आपली वाट पहात आहेत… आपणस विनंती आहे आपण शेगांवी चलावे… बंकटलाल यांची प्रार्थना महाराजांनी स्वीकार केली आणि ते बैलगाडीत बसले. पिंपळगावतील लोकांना अश्रू अनावर झाले. बंकटलाल यांनी सर्व गावकर्यांना म्हणाले आपणस विनंती आहे. महाराजांना भेटण्यास आपण शेगांवी येत जावे तरी आपण आम्हाला निरोप द्यावा. काही अंतर गेल्या नंतर श्री गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले. हि सावकाराची रीत असते का ? दुसऱ्याचा माल बळजबरीने न्यावा मला तर तुझ्या घरी येण्यास भीती वाटते. महालक्ष्मी जी जगद्जननी आहे जिची सर्वत्र सत्ता तिला सुद्धा तू कोंडून ठेवले आहे. तिथें माझे काय ? म्हणून मी निघून गेलो होतो. महाराजांची हि वाणी ऐकून बंकटलाल खूपच विनय पूर्वक महाराजांना म्हणाले महाराज. महाराज माझ्या कुलुपाला ती जगन्माता भ्याली नाही तर तुमचा वास तिथे आहे म्हणून ती माझ्याकडे स्थिर ( चिरकाल ) आहे. ज्या ठिकाणी आई असते तिथेच बाळ असते. महाराज आपल्या चरण कमला पुढे माझ्या साठी काहीच मौल्यवान नाही. आता माझे असे काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. माझी आपणस इतकीच विनंती आहे आपण शेगांवात रहावे. अशा रीतीने श्री गजानन महाराज पुन्हा शेगांवात आले. सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – खरंतर आजची लीला म्हणजे आपणस भक्ती कशी असावी हे आपणस समजण्यासाठी केलेली हि लीला आहे हाच बोध आपणास मिळत आहे. पहा ना बाजारात केवळ चर्चा झाली कि कुणीतरी अवलिया पिंपळगावात आले आहेत यावरून बंकटलाल यांच्या मनात लगेचच सकारात्मक विचार आला कि नक्कीच ते श्री गजानन महाराजच असणार. किती तो विश्वास आणि श्रद्धा आणि त्याचे फलस्वरूप खरोखर ते श्री महाराजच होते. आपणासही आपली भक्ती वाढवायची आहे. श्री बंकटलाल यांनी महाराजांना विनंती केली महाराज आपण शेगांवी चलावे.. यावरून आपल्या लक्षात येते कि श्री बंकटलाल यांची महाराजांच्या चरणी जी काही श्रद्धा… भक्ती होती किती उच्च असेल. कारण परब्रम्हाला आपल्या सोबत नेणें म्हणजे तितकेच त्यांचे सुद्धा आपल्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. यावरून आपणस आपले व महाराजांचे नाते कसे निर्माण झाले पाहिजे याची समज प्राप्त होते. काही अंतर गेल्या नंतर महाराज श्री बंकटलाल यांना म्हणतात मला तुझी भीती वाटते कारण तू लक्ष्मी मातेस बंदिस्त केले आहे… यावर श्री बंकटलाल म्हणतात महाराज जे कि आहे ते तुमचे आहे. तुम्ही आहात म्हणून जगद्जननी माझ्याकडे वास करत आहे. मला आपले चरण कमल सोडून काहीच नको. इथे खूप खोल असा संदेश महाराज देत आहेत. लक्ष्मी हि कमवलीच पाहिजे पण लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर आपले मन लगेचच त्याच गोष्टीला सर्वस्व मानते आणि इथेच गडबड होते. असे होऊ नये यासाठी बंकटलाल यांचे वाक्य आपणस नेहमी लक्षात ठेवायचे आहे. जी काही जगद्जननी लक्ष्मी मातेची कृपा आहे ती सर्व आपल्या महाराजांची कृपा आहे. कुठेच मला अहं भाव ठेवण्याची चूक करायची नाही.पहा हा भाव आपल्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी मातेचा वास असेल आणि आपल्या ह्रदयातून फक्त धन्यवाद चे भाव येतील… धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद . चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया

हे समर्था आजची तुझी लीला म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याचा आमच्या साठी प्रसादच आहे.. हा प्रसाद आम्हाला दिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… जशी श्री बंकटलाल यांना भक्ती प्राप्त झाली.. अशी भक्ती आमच्या ह्रदयात जागृत कर.. कारण हे सर्व तुझ्या कृपेशिवाय शकय नाही… तुझ्याच कृपेने आमच्या जीवनातं.. जगद्जननी श्री लक्ष्मी मातेचा वास आहे.. हि समज दिलीस त्या बद्दल धन्यवाद… हि जी समज आज प्राप्त झाली आहे ती आमच्या अंतर्मनात रुजव कारण आमचे मन कायम स्व चा नारा लावते आणि इथेच मी अडकतो.. कृपा कर मला या पासून वाचवं… आणि प्राप्त लक्ष्मीचा वापर योग्य पध्द्तीने करण्याची समज मला दे.. कारण तू भरपूर देतोस.. धन्यवाद समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

डिजिटल दुनिया –

डिजिटल दुनिया - आज का युग डिजिटल युग है .. हम सभी डिजिटल हो गए है ... एक समय था की हम एक दूसरे से  सवांद करने के लिए कई महीने- साल रुकना पड़ता था... क्यूंकि लोगों को एक गांव से दूसरे गांव संदेशा  देने के लिए  किसीको भेजना पड़ता था ..बाद में संदेशा  भेजने के लिए पत्रों...

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी  - गणेश भक्तोंका एक व्रत  है जिसे संकष्टी चतुर्थी  कहाँ  जाता है ! अनेक भक्त यह व्रत करते है ! इस व्रत के पीछे बहोत सी कथाये है ! अभी हम गणेश पुराण में जो कथा है वो यहाँ देखते है ! कृतवीर्य  नाम के राजा थे वे एक परिपूर्ण ऐसे राजा थे ! उनकी पत्नी का नाम...

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ की जाती है ?

भगवान् श्री गणेश जी की पूजा सर्वप्रथम क्यूँ  की जाती है ? वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कार्य कोनसा भी हो उस कार्य का आरंभ भगवान् श्री गणेश जी की पूजा से किया जाता है ! यह प्रथा बरसो से चल रही है और चलती रहेगी जब हम...

कीर्तन भक्ति – नवविधा भक्ति

नवविधा भक्ति का दूसरा प्रकार कीर्तन भक्ति...सचमें कीर्तन करना भी भगवद भक्ति में आता है यह हमारे लिए कितनी आनंददाई बात है... कीर्तन भक्ति यानी ईश्वर के गुण, चरित्र, नाम, पराक्रम आदि का आनंद से सबके साथ कीर्तन करना... अब हम पहले भक्ति में श्रवण करते है... जो भी कुछ...

गजानन महाराज चरित्र दर्शन 6

श्री महाराज इन्होंने भोजन किया पीताम्बर ने लाया हुवा पानी पिया उसके बाद श्री महाराज बंकट लाल को बोलते है..तुम्हारे जेब में जो सुपारी है वो दो हमको ..श्री महाराज ने ऐसे बोलते ही श्री बंकट लाल ने जेब से सुपारी निकालकर श्री महाराज को दी उसी जेब में..दो पैसे थे वो भी।उसने...

श्रवण भक्ति – नवविधा भक्ति

हमारी संस्कृति  में भक्ति के नौ प्रकार बताये गए है... इस प्रकार में सर्वप्रथम आती है श्रवण भक्ति... हर एक भक्ति पद्धति अलग अलग होती है... लेकिन श्रवण भक्ति सभी लोग जाने अनजाने में करते ही है...इसके बारे में श्री समर्थ रामदास स्वामी कहते है " प्रथम भजन ऐंसे जाण |...

स्मार्ट फ़ोन या सेल्फी फ़ोन

स्मार्ट फोन से हम  स्मार्ट बन गए.. सच  में स्मार्ट फ़ोन की वजह हम अनेक यादे फोन में चित्रित कर सकते है... यह हमें मिला हुवा वरदान ही है... क्यूंकि १५ साल पहले फोटो निकले के लिए  हमें फोटो स्टुडिओ जाना पड़ता था... आज हम जहाँ जायेंगे वहाँ फोटो निकाल सकते है.. वो फोटो...

श्री गजानन महाराज दर्शन लीला ०५

श्री बंकटलाल और पीतांबर  शिंपी  कीर्तन सुनने गए थे... लेकिन उधर ह उनको श्री गजानन महाराज दिखे... फिर क्या वो कीर्तन छोड़कर श्री महाराज के पास आ गए... उन्होंने श्री महाराज जी से पूछा...की आपको खाना लावू क्या? तब श्री महाराज उन्हें बोले आपको जररूत होंगी तो मालिनी के घर...

गजानन महाराज चरित्र दर्शन 4

श्री गजानन महाराज जी के दर्शन क प्यास जगी श्री बंकटलाल जी के मन में   श्री गजानना चरित्र दर्शन ४ - श्री बंकटलाल जी को पूर्ण विश्वास था की श्री गजानन महाराज जी ब्रम्हांड नायक है... अब उनके मन में श्री दर्शन की प्यास जग गई थी... उनको भूख प्यास मीट  गई थी... उनकी...

नवरात्र व आपली प्रगती

  नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी...आपण अनेक सण- वार साजरे करतो... करत आहोत... आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे... आपण दरवर्षी नवरात्र साजरी...