नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी…आपण अनेक सण- वार साजरे करतो… करत आहोत… आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे… आपण दरवर्षी नवरात्र साजरी करतो.. उपवास करतो…अनेक गोष्टी करतो पण आपल्या प्रगती साठी या कालावधी मध्ये काय करतो… आपण म्हणाल आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रगती साठीच तर करतो…खरं तर नवरात्र म्हणजे शक्ती च्या जागृती चा उत्सव… प्रत्येक आई ला वाटते आपले मुलं खूप मोठे व्हावे… पण मग त्यासाठी आपण सुद्धा कष्ट करणे आवश्यक आहे कि नाही… खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आध्यत्मिक उन्नतीचे पर्व..पण मग आपली अध्यात्मिक प्रगती कशी होईल… केवळ उपवास करून… तीर्थ यात्रा करून होईल का … खरतर नवरात्र म्हणजे आपल्या घरीच राहून साधना करण्याचे पर्व..या कालावधी मध्ये जपानुष्ठान साठी सर्वोत्तम असतो… आपण या काळात आपल्या ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याची अशी जप संख्या करण्याचे अनुष्ठान करावे… जसे देवीचा कोणताही मंत्राचे आपण या ९ दिवसात… २१, ५१ किंवा १ लाख जपाचे अनुष्ठान करू शकता का…यातून आपली अध्यात्मिक प्रगती तर होईलच पण त्याच बरोबर आपले चित्त स्थिर होण्यास मदत होईल..आणि हीच खरोखर देवी भगवतीची सेवा असेल… चला तर मग आपल्या कडे जे काही दिवस आहेत त्यात अधिकाधिक आपल्यावर काम करू या… चला तर मग सेवेस सुरुवात करूयात… पुढील भागात या विषयावर अजून सविस्तर चर्चा करूया… आपले चॅनेल सुब्स्क्रिब करा इतरांनाही सांगा… धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद
प्रार्थना – हे देवी भगवती… हा नवरात्र उत्सव आमच्या जीवन बदुलन टाकणारे होऊ दे… आम्हाला आमच्या स्वतः वर काम करण्याची प्रेरणा तू उत्सवाला निमित्त करून आम्हाला दिलीस हि तुझी कृपाच आहे… हे आई तुला भूषणावह होईल अशी कर्म रुपी सेवा आमच्या कडून करून घे… धन्यवाद आई… धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद! www.chetnakeswar.com