श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 6, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

उन्हाळ्याचे दिवस होते… श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते…त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता… तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता… आंब्याचे दिवस होते… त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते… महाराजांनी एक दोन आंब्याच्या फोडी खाल्या… अचानक श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस म्हणाले… चंदू मला आंबे नकोत… तुझ्या घरी उतरंडीला दोन कान्होले ठेवले आहेत ते घेऊन ये… मला ते खायचे आहेत…श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज कान्होले नाहीत घरी तयार…आपली अनुमती असेल तर मी ताजे कान्होले तयार करून आणतो… श्री महाराज चिडून म्हणाले… गुरूंशी खोटे बोलू नकोस… जा लवकर… उपस्थित लोकांनी चंदू ला सांगितले कि महाराज अंगात आहेत त्या प्रमाणे घरी जाऊन पहा… श्री श्री चंदूमुकीम घरी जाऊन आपल्या पत्नीस सर्व सांगतात… तेव्हा त्यांची पत्नी म्हणते… अहो एक महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.. आपल्या घरात कान्होले नाहीत… ती म्हणाली अहो आपल्या घरात सर्व सामान आहे… मी लगेचच ताजे कान्होले तयार करते… तेव्हा श्री चंदूमुकीम म्हणाले महाराज म्हणत आहेत त्या प्रमाणे तू उतरंडीला तपासून पहा… असे म्हण्टल्या नंतर एकदम तीला आठवेल आणि ती तिच्या पतींना म्हणाली..समर्थ जे म्हणत आहेत ते खरे आहे… अहो मी खापराच्या कळशीत २ कान्होले ठेवले होते… व ती कळशी उतरंडीला ठेवली आहे… परंतु ते कान्होले आत खराब झाले असतील… श्री चंदूमुकीम यांनी उतरंडी वरील ती खापराच्या कळशी काढली… ती कळशी काढून त्यातील कान्होले पाहले तर.. ते कान्होले ताजे तवाने होते.. ते खराब झाले नव्हते… ते कान्होले घेऊन ते लगेच महाराजांकडे जातात… सर्वांना महाराजांच्या वाणीचा अनुभव येतो … सर्वजण एका घोषात महाराजांचा जय जयजय कार करतात !!

बोध – वरील लीला म्हणजे महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाची अनुभूती देणारी लीला आहे…उपरोक्त लीलेत उतरंडीस कान्होले ठेवले होते… उतरंडी म्हणजे अशी जागा कि सहसा आपले लक्ष जात नाही … खरंतर वरील लीला एक निमित्त आहे आपल्याला समज देण्यासाठी… जसे कान्होले होते घरातच पण त्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते… त्याच प्रमाणे आपल्या मध्ये देखील काही नकारात्मक गुण असतात जे आपल्या मनाने झाकलेले असतात त्याचे आपणस कधी दर्शन होत नाही… महाराज आपल्या जीवनात दुःख संकट देऊन आपणस काम करण्याची संधी देत असतात.. पण जसे वरील लीलेत श्री महाराज श्री चंदूमुकीम यांस सांगत होते उतरंडीस कान्होले आहेत ते मला हवे आहेत… पण श्री चंदूमुकीम यांचे नकारात्मक मन त्यास विरोध करत होते… पण त्यांची भक्ती उच्चतम होती त्यामुळे त्यांना महाराजांच्या अंतःसाक्षित्वाची अनुभूती आली.. आपण हि श्री चंदूमुकीम यांच्या प्रमाणे विरोध करतो… आणि आपल्यातील नकारात्मक सवयी… विचार यावर काम करण्यास तयार होत नाही… आणि आपण आलेले संकट वा दुःख यांस केवळ नकारात्मक विचारांतून पाहतो … त्यामुळे आपल्यातील भक्ती ची पातळी खालावते… खरंतर आपल्या जीवनात जर संकट वा दुःख आले तर आपणस वरील लीलेतील उतरंडी ची आठवण करायची आहे… जी आपणस सांगत आहे… दुःख व संकट फारच कमी आहे… फक्त गरज आहे थोडेसे वरती डोकावून पाहण्याची… जर आपण आपले विचारात सकारात्मकता आणली तर… जसे श्री चंदूमुकीम यांना खापराच्या कळशीत कान्होले सापडले तसे… आपल्या जीवनात देखील यशरूपी कान्होले आपणस प्राप्त होतील… धन्यवाद महाराज … कोटी कोटी धन्यवाद !!
चला आपण त्यासाठी श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था आजची तुझी लीला तर आमच्या साठी दृष्टिदान आहे… आम्ही तर नकारात्मक विचार करतो.. पण वरील लीलेतून तू आम्हास संकटाकडे पाहण्याची दृष्टी दिलीस त्या बद्दल धन्यवाद… इथून पुढे आम्ही प्रत्येक संकटाकडे वा दुःखाकडे नव्या आशेच्या किरणाने पहावे अशी दृष्टी आम्हाला दे… एक संधी म्हणून प्रत्येक संकटाकडे पाहण्याची बुद्धी दे… हे समर्था हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

सच्ची पितृ पूजा

हर साल हम पितृ पूजा करते है.. हमारी संस्कृति में साल में १६ दिन हमारे पूर्वजों  की पूजा के लिए दिए है.. यह हमारे पूर्वजों  के प्रति सदभावना व्यक्त करने का दिन... सचमें हमारे पूर्वजोंने कितना विचार पूर्वक यह सब बनाए है..सचमें यह सब देखने के बाद गर्व होता है.. लेकिन कुछ...

श्री महालक्ष्मी पूजा

भाई और बहनो  आप सभी को नमस्कार ! हम सभी लोग अभी श्री गणपति बाप्पा और  साथ में कुछ लोग श्री महालक्ष्मी की भी पूजा कर रहे... सभी तरफ खुशियों का वातावरण है... या सभी पूजा पाठ जब देखता हु... उसके पीछे अपने पूर्वजों  की जो धारणा थी बहोत ऊँची थी... गणपति के साथ... श्री...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इनका जन्म ५ सितम्बर १८८८  को तिरुत्तनी गांव जो  चित्तोर जिल्हे में  तमिळनाडू राज्य में हुवा था | उन्होंने अपनी शिक्षा दर्शनशास्त्र में M.A. किया | उन्होंने शिक्षा पूरी होने के बाद साहयक प्रोफेसर का काम मद्रास प्रेसि डेंसी कॉलेज में और बाद में...

गजानन महाराज चरित्र दर्शन ३

गजाजन महाराज बोल रहे है - यह सम्पूर्ण सृष्टि ब्रम्ह व्याप्त है... यहाँ मैला या शुद्ध ऐसा कोई भेद नहीं   श्री गजानन महाराज जी ने भोजन किया यह हम ने दूसरी लीला में देखा... अब श्री महाराज जी का भोजन ख़त्म होने के बाद...उनको पीने के लिए  पानी चाहिए...यह विचार बंकटलाल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला-2

श्री बंकटलाल अग्रवाल जी बोले हमारा शेगांव धन्य है... ब्रम्हांड नायक योगिराज शेगांव  में आये। ..!! हमने प्रथम लीला में देखा ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कूड़े में फेंके हुवे फेके हुंए थाली से चावल के शीत उठाकर खा रहे थे ! अभी यह जो दृश्य है वह आने जाने वाले लोग...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय - ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ...

श्री दास गणू महाराज

इनका नाम श्री गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उनको हम सब श्री दास गणू महाराज जी के नाम से जाने जाते है | उनका जनम शके १७८९, पौष शुद्ध एकादशी (दि.०६ /०१/१८६८) को हुवा था | उनका घर का आर्थिक स्तर बहोत अच्छा था | उनकी शिक्षा ४ तक हुवी थी | वे सदैव आनंदी एवं हसत मुख रहते थे |...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र...

श्री गजानन महाराज प्रथम दर्शन लीला

परब्रम्ह श्री गजानन महाराज कुछ न बोलके भी हमे बता रहे है " अन्न ही परब्रम्ह है" श्री गजानन महाराज लीला - शेगांव में एक देवीदास पातुरकर नाम के गृहस्थ रहते थे ! वह मठाधिपति थे ! एक दिन उनके लड़के की ऋतु शांति का विधी घर मे थी उस वजह से उन्होंने अनेक लोगोंको को भोजन करने...