श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Feb 13, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली…. खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती… परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच… पण उलट श्री महाराजां बद्दल अश्रद्धा युक्त शब्द उच्चारले… असो त्याच दिवशी श्री जानकीराम यांच्या कडे श्राद्ध होते …श्राद्ध विधी साठी त्यांनी अनेक लोकांना बोलावले होते… श्राद्ध पूजा साठी त्यांनी सर्व स्वयंपाक केला होता …त्यात मुख्य असते ती खीर आणि वडा हे पदार्थ सुद्धा त्यानी बनवले होते… श्राद्ध पूजा पूर्ण झाली ..आता भोजन करण्याची वेळ आली.. सर्व जण जेवण करण्यासाठी बसले सर्व पदार्थ वाढण्यात आले खीर वाढण्यासाठी श्री जानकीराम यांनी पातेले हातत घेतले तर.. त्यांना खिरीत काही तर वळवळ करताना दिसले …त्यानी व्यवस्थित पाहिले तर त्यांना दिसले कि संपूर्ण खिरीच्या भांडयात त्यांना अळया दिसू लागल्या.. हे सर्व पाहून सर्व लोक जेवण न करताच तसेच निघून गेले..  हे सर्व कसे झाले यावर त्यानी विचार केल्या नंतर त्याना असे वाटले कि आपण श्री महाराजांना अग्नी दिला नाही …तसेच त्यांच्या बद्दल अपशब्द बोललो त्या मुळे हे घडले असावे… हा विचार क्ररुन ते श्री महाराजांकडे गेले तिथे बंकटलाल होते.. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याना विनंती केली कि मला श्री महाराजकडे घेऊन चला… मला त्याची माफी मागायची आहे… बंकटलाल त्याना श्री महाराजांकडे नेतात श्री महाराजांकडे जाताच जानकीराम क्षमा प्रार्थना करतात …महाराज आपण साक्षात उमानाथ आहात… मला माफ करा… आज माझे सर्व संशय दूर झाले ..माझे अपराध पोटात घ्या… इथून पुढे मी कुणाचीच मजाक करणार नाही… कुणाची टीका करणार नाही.. मला आज जी शिक्षा दिलीस ती पुरी आहे… तू अनाथांचा नाथ आहेस… आता माझा अंत पाहू नकोस… महाराजांनी श्री जानकीराम यांच्याकडे पाहिले आणि बोलले.. अरे आन इकडे ते खिरेचे भाडे अरे यात अळया नाहीत… उलट तुझी खीर खुपच मधुर आहे …महाराजांची हि लीला पाहून सर्वाना महाराजांच्या अंत साक्षीत्वाचा अनुभव आला सर्वानी एक घोषात महाराजांचा जय जय कार केला.

बोध – वरील लीला म्हणजे आपल्या मनाला शिकवण आहे.. श्री जानकी राम यांच्या मनात जश्या शंका येत होत्या… अश्या अनेक शंका आपल्या मनात आपण अडचणीत असताना येत असतात… नक्की महाराज माझे काम करतील का ? अनेकदा आपण इतक्या अडचणीत असतो कि आपण कळत न कळत महाराजांन बद्दल शंका मनात निर्माण होते … खरे तर त्या वेळेस आपल्यातील जानकीराम जागृत असतो.. आणि तो आपणस महाराजांपासून दूर नेत असतो ..आणि आपण कधी दूर जातो हे आपणस हि कळत नाही.. वरील लीलेत खिरीत अळ्या झाल्या असे श्री जानकी राम यांना दिसल्या.. यातून महाराज आपणस सांगत आहेत ..अरे जश्या त्या खिरीत अळ्या झाल्या त्या मुळे ती खीर खाण्यास लायक नाही ..त्याच प्रमाणे आपल्या मनात.. विचारात जी बाधा आहे… ती असेल तर आपण खरी भक्ती करू शकत नाही… त्या साठी आपणस आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे… जेणेकरून मनातील अळ्या म्हणजे कुविचार जातील… आणि आपण आपले लक्ष प्राप्त करू शकू ..खरे तर महाराजांची प्रत्येक लीला हि आपल्या साठीच आहे.. फक्त गरज आहे त्यावर चिंतन मनंन करण्याची व त्या नुसार काम करण्याची चला तर मग आपण महाराजांना प्रार्थना करूया !!

श्री गजानन महाराज आजच्या लीलेस माध्यम करून… आज आपण आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवलेत.. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. खरे तर आम्ही अनेक काम करतो ..पण कधी स्वतःच्या मनावर कार्य करत नाही.. कारण माझे मन नेहमी सांगते कि मीच बरोबर आहे.. आणि हि जी ..मी ..मी ..ची बाधा आहे.. तीच मला तुझ्या सत्य स्वरूपा पासून दूर नेते.. जसे जानकीराम यांच्यावर कृपा केलीत तशी कृपा आमच्यावर करा… माझे मन मी ..मी च्या ऐवजी …तुझ्या नामाचा धावा करेल ..अशी शिकवण माझ्या मनाला दे.. कारण जेव्हा मन तुझ्या नामात अडकेल.. तेव्हा ते मी ..मी करणार नाही.. आणि त्यामुळे तुला अपेक्षित असणारी अभिव्यक्ती सहजपणे आमच्याकडून होईल ..धन्यवाद आई.. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!!

 


Share
और पढिये !!

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......