बाळांनो… मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय… हो तुमची माई बोलतेय… बेटा दचकू नकोस…मी तर अनंतात विलीन झाले… हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा… सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली… भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… पण खरंच मला एक सांग खरंच तुला असे वाटते कि मला श्रद्धांजली व्हावी… जी कायम सतत येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा असेल…मी तुला एक काम सांगते… काम अवघड नाही तसेच सोपे हि नाही कारण तुला हि तुझा प्रपंच आहे… तुझा प्रपंच सांभाळता… सांभाळता एक काम करशील…तुला जशी शक्य आहे तशी अनाथ मुलांना… अनाथ वृद्धांना मदत करशील… असे मी म्हणणार नाही कि तू अमुक इतकीच मदत कर…तुला जशी शक्य आहे तशी मदत कर…तू मनात आणशील तर एका अनाथ मुलाचे जीवन तू बदलू शकतोस…तुझ्या आसपास अनेक अशी मुले आहेत… अनेक वृद्ध आहेत ज्यांना कुणीच नाही… त्यांना तुला जशी शकय आहे तशी मदत कर… तुझ्या उत्पन्नाच्या २ ते ५ टक्के मदतीने ते अनाथ बाळ चांगले शिकू शकते बेटा…बेटा या यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव मदत कर पण तू ती मदत निस्वार्थ भावनेनें कर…जर तू हे कार्य करू शकलास तर नक्कीच तीच मला खरी श्रद्धांजली असेल
आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी
श्री समर्थ रामदास स्वामी दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......