श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 2, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३
भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा
श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते…ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते… घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली… त्याची तब्येत इतकी खराब झाली कि त्यांनी अंथरुनच धरले…अनेक वैद्य त्याचे उपचार करत होते परंतु दिवसेंदिवस तब्येत आणखीनच खराब होत होती…अनके वैद्य आपले प्रयन्त करत होते परंतु कुणालाच यश येत नव्हते… शेवटी वैद्यांनी सांगितली कि आता यांच्यावर काहीच उपचार होऊ शकत नाहीत… सर्वांनीच आशा सोडून दिली.. त्यातील काही जणांनी सुचवले कि… आपण श्री गजानन महाराज त्यांच्याकडे जाऊन त्याना मार्गदर्शन मागावे… नक्कीच काही तरी मार्ग मिळेल… मग उपस्थित लोक पैकी एक जण श्री गजानन महाराजांकडे गेले.. तेव्हा श्री महाराज बंकटलाल त्यांच्या घरी होते … त्यानी श्री बंकटलाल यांना सर्व काही सांगितलं व विनंती केली कि आपण श्री महाराजांना विनंती करून त्यांचे चरण तीर्थ जानराव त्यांच्यासाठी द्यावे… बंकटलाल यांनी सांगितले कि हे काम मी करू शकत नाही… आपण माझ्या वडिलांशी बोलून पाहावे… ते श्री भवानीराम यांच्याशी बोलले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला… सर्व वृत्तांत ऐकून भवानीराम यांचे ह्रद्य द्रवित झाले… ते श्री महाराजांकडे गेले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जर आपण आपले चरण तीर्थ दिलेत तर आम्हाला विश्वास वाटतो कि श्री जानराव यांची तब्येत नक्कीच सुधारेल… श्री महाराज यांनी चरणतीर्थ देण्याची परवानगी दिली… श्री च्या चरण तीर्थाने जानराव यांची तब्येत सुधारली आणि ते पूर्णपणे बरे झाले व आठ दिवसातच ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले… हे सर्व पाहून उपस्थित सर्वांनी श्री महाराजांचा जय जय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय
बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीलेतून आपणस खूप खोल असा संदेश प्राप्त होत आहे..
श्री जानराव देशमुख यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती…अनेक वैद्य त्याच्यावर उपचार करत होते… परंतु कोणत्याच वैद्याला यश प्राप्त होत नव्हते… सर्वांनी आशा सोडून दिली…परंतु त्यात काही लोक असे होते कि ज्यांचा विश्वास हा उच्च होता… या ठिकाणी आपणस श्रद्धा आणि भक्ती चा भाव समजवून घ्यायचा आहे… आपणस कुठेही अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाहीये… वरील लीला हि त्या वेळेनुसार आहे… आज जर आपण आजारी असाल तर आपणस योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचे आहेत.. वरील लीलेत बंकटलाल यांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांशी बोलण्यास सांगितले… म्हणजेच इथे आपणस त्यांची श्री महाराजांवर जी श्रद्धा होती… ती किती वरच्या पातळीवर होती… त्याना महाराजांना अश्या प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले…. भवानी राम यांनी सुद्धा श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली… व त्यांच्या परवानगी नंतर चरण तीर्थ दिले… इथे चरण तीर्थ हे… आपल्यातील विश्वासाचे प्रतीक आहे… पहा श्री जानराव देशमुख श्री महाराजांच्या चरण तीर्थाने पूर्णपणे बरे झाले… इथे चरण तीर्थ म्हणजे विश्वास..पहा आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर आपणस औषध देतात जर आपला डॉक्टरांवर विश्वास असेल तर आपणस एकाच दिवसात फरक जाणवतो… इथे औषध काम करतेच पण आपल्यातील डॉक्टरांवरील विश्वास काम करतो व आपणस बरे वाटण्यास सुरवात होते.. थोडक्यात आपला विश्वास आपणस वाढवायचा आहे.
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया -श्री गजानन महाराज आपली लीला म्हणजे आमच्यासाठी विश्वास रुपी औषध आहे… आमचे मन कायम प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करते..श्री .जानराव यांच्या जीवनात जसे सकारात्मक लोक आले तसे सकारात्मक विचारांचे लोक आमच्या जीवनात येऊ द्या…आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला थोडे थोडे विश्वास रुपी चरण तीर्थ आम्हाला मिळावे जेणेकरून प्रत्येक परिस्थिती आमच्यातील श्रद्धा विश्वासाची पातळी उच्चत्तमच असेल… धन्यवाद महाराज… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित - आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे...असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते... पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि... आपण स्वामींचे सेवेकरी आहोत... कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे - आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते... उद्या काय होईल... माझे अमुक काम होईल कि नाही... आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते... उद्या काय होईल याची... कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

https://youtu.be/6tmiZRVB_Sg   श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे... ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत . आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात...

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे - खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत... यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि... देव घर कसे असावे... ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते...आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर...

अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते... ते मठाधिपती होते... एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता... त्या...

श्री गजानन चरित्र दर्शन ८

हमने लीला क्रमांक ८ मी देखा श्री गजाजन महाराज बंकटलाल के घर पर हि रहे... दुसरे दिन श्री महाराज कि विविध सुंगधी द्रव्य... से उनो मंगल स्नान किया गया... उनकी षोडष उपचार सहित पूजा कि गई... नैवैद्य भी दिखाया... सचमे इतना भक्ती मय  वातावरण था कि सभी लॉग सबकुछ भूलकर श्री...

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच... आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील... हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा... आपण सर्व जण पूजा करतो... आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत... आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि...

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता... आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो... कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो... त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे......

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है... आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है... साढ़ेसाती यानी - हमारे उन्नति का राजमार्ग...अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो......

श्री गजानन महाराज दर्शन लीला 7

श्री बंकटलाल इन्होंने  अपने पिताजी श्री भवानी रामजी से श्री गजानन महाराज जी के बारे सबकुछ बताया और उनसे श्री महाराज को अपने घर पर ले आने की अनुमती  माँगी ..श्री भवानी रामजी ने उनको अनुमति दी... अब  श्री बंकटलाल जी उन्हें ढूंढने लगे... चार दिन के  बाद संध्या समय को...