श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

Nov 25, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांना सगळीकडे श्री गजानन महाराज आहेत असे वाटत होते त्यांच्या मनाची ही अवस्था ते कोणाला सांगू पण शकत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की,बाळा काय झाले आहे तुला?काही चिंता तुला भेडसावत आहे काय ?तुझी तब्येत तर ठिक आहे ना. त्यांनी वडिलांना सगळे ठिक आहे असे सांगितले परंतु त्यांचा शोध चालूच होता त्यांच्या घरा जवळच श्री रामाजी पंत देशमुख नावाचे वयस्कर गृहस्थ राहत होते ते खूप थकलेले होते त्यांना श्री बंकटलाल ह्यांनी श्री महाराज ह्यांच्या विषयी सांगितले तेव्हा त्यांनी बंकटलाल ह्यांचे शब्द ऐकल्यावर ते म्हणाले की ते कोणी संत महात्मा असणार अशातच चार दिवस निघून गेले श्री बंकटलाल ह्यांच्या मनात ते चालूच होते त्या दिवशी गावात श्री गोविंद बुवा टाकळीकर नावाचे मोठे किर्तनकार आले होते आणि त्याचे त्या दिवशी तेथे किर्तन होते त्यांच्या किर्तनाला श्री बंकटलाल गेले होते तेथे त्यांचा मित्र पितांबर आला होता त्या दोघांची तेथे भेट झाली तेव्हा श्री बंकटलाल ह्यांनी त्यांना श्री गजानन महाराज ह्यांच्या विषयी सांगितले त्याचवेळी श्री बंकटलाल ह्यांना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 

बोध -वरील लीलेतून आपल्याला असा बोध होतो की ,तो म्हणजे आपली श्रद्धा ,भक्ती असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिच आपल्यासाठी चांगली शिकवण आहे हेच पाहणा ,श्री बंकटलाल ह्यांचा विश्वास इतका दृढ होता की एकाच भेटीत त्यांची श्री महाराजांवर श्रद्धा बसली होती… त्यांची श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची आस इतकी दृढ होती की त्यांना चार दिवसात परत श्री महाराजांचे दर्शन झाले… येथे अजून एका  गोष्टींचा आपल्याला बोध होतो तो म्हणजे श्री बंकटलाल ह्यांच्या कडून तो असा की ,आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहीजे . येथे पहा की ,त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की काही समस्या आहे का?परंतु बंकटलाल ह्यांनी त्यांना काही त्रास नको म्हणून त्यांना आदरपूर्वक सांगितले की काही समस्या नाही आहे त्या नंतर त्यांनी श्री गोविंद बुवा ह्यांना सगळी गोष्ट सांगितली तर त्यांनी सकारत्मक भावाने त्यांना सांगितले की ते कोणी महान पुरुष असतील त्यांच्या तोंडाने ही  गोष्ट ऐकल्यावर तर त्यांची श्रद्धा खूप वाढली त्यानंतर त्यांनी खुप पार्थना केली असेल आणि त्याचाच परिणाम म्हणा असे झाले की ,त्यांना श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज ह्यांचे दर्शन प्राप्त झाले बोला श्री गजानन महाराज ह्यांचा जयजयकार असो  त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली बोला श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

प्रार्थना -हे ब्रह्मांड नायका आज आपण आम्हाला आजच्या लीलेच्या माध्यमातून जो भक्ती,श्रद्धा,आणि विश्वास याची शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद इतकी श्रद्धा,भक्ती,आणि विश्वास आमच्या मनात जागवा की जेणेकरून आपल्या लिलांचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पात्र असू ही प्रार्थना करून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद


Share
और पढिये !!

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत मागें एक पुढे एक । ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक । तो एक पढत मूर्ख ।। रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते......

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा - नामाचा महिमा अगाध आहे... खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते... आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले ... त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा...

उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात. वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । - बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये... म्हणजे...

श्री गजानन चरित्र दर्शन 9 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

श्री गजानन महाराज बोल रहे है- जब व्रत लिया उस वक्त सोचा नही और अब जब व्रत कि पूर्ती करते वक्त क्यूँ हिचकिचाते हो ! लीला- श्री गजानन महाराज बंकटलाल के घर शेगांव मी रह रहे थे ... काशी के गोसावी थे.. उन्होंने श्री गजानन महाराज जी कि लीलाए सुनकर...एक व्रत लेने का निर्णय...

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे... आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत... समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन...

श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

आपले गजानन महाराज बोलत आहेत - हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही. श्री गजानन महाराज लीला - श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले... आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार...

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है... इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए... भगवान् घर ऐसा हो... जहाँ हमारा चित्त स्थिर हो... मन शुद्ध हो... आंतरिक आनंद प्राप्त हो...ऐसा भगवांन का घर हो... आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ - या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ ...म्हणजे स्वामी चरणाची विभूती... स्वामी चरणी व वंदन... स्वामी नामाची साधना... स्वामी नामाचे ध्यान... आणि स्वामी चरणाचे  तीर्थ... हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे......