स्वामीं भक्तहो… अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत…पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील तर तो जो काही दोष आहे..तो मुळापासून दूर कसा होणार..आज आपण अश्याच एका उपायांवर चिंतन मनन करणार आहोत..आज आपण आपल्या घरांना विविध नावे देतो..जसे मातृ पितृ निवास, स्वामीं निवास,स्वप्न पूर्ती निवास..असे अनेक नावे आपण आपल्या वास्तूला देत असतो..पण नाव देताना हे नाव आपणस काय प्रेरणा देत आहे.. यांवर देखील आपण चिंतन मनन करणार आहोत…काही दिवसांपूर्वी एक पाटी मला स्वामीं कृपेनं मिळाली.. त्यावर लिहलं।आहे..” हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो” या वर चिंतन मनन झाले..एक विचार सुद्धा आपले जीवन बदलून टाकू शकतो तसेच हा एक विचार नक्कीच वास्तू दोष घालवू शकतो प्रेरणा मिळाली..पहा मी कुणाच्या घरात राहतो…स्वामीं च्या म्हणजेच ब्रम्हांड नायकाच्या घरात राहतो..जे स्वामीं चे घर आहे तिथे दोष कसा असणार..पहा एक।विचार कसे जीवन बदलून टाकतो.. इथे महत्वाचे सांगावेसे वाटते की इतरही गोष्टी आपण नाकारत नाही पण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करतो तेव्हाच आपणस यश प्राप्त होते..असो.. पहा जेव्हा हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जाईल तेव्हा आपण प्रत्येक घराकडे आपल्या स्वतःच्या घराकडे..जे घर आपले ऊन , वारा पाऊस अश्या अनेक संकटापासून रक्षण करते ते आपणस गृह मंदिरच वाटेल..आणि सर्व दोष दूर होतील हा विश्वास आहे..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय!.धन्यवाद स्वामीं!
आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”
स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...