स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)*
*आजचे चिंतन-मनन*
स्मरण तुझे मज नित्य असावे !
तव गुण भावे गावे !!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे…स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे मागतो..स्वामीं मला हे..ते दे..माझे अमुक काम कर..तमुक काम कर..स्वामीं आपण मागतो ते देणारच आहेत.. आणि आपण ही मगितलेच पाहिजे..पण आपण काय मागतो हे फार महत्वाचे आहे..आपल्या मागण्यात व्यवहारिक पणा नसावा..माझे अमुक काम कर मी हे करेल..अरे स्वामीं आहेत ते ब्रम्हांड नायक त्यांना आपण काय देणार..दयाचे असतील तर आपल्यातील अवगुण स्वामीं चरणी अर्पण करा.. मागायचे असेल तर..स्वामींनाच का मागू नये..स्वामीं तुम्ही माझे आहात..पण मला नेहमी याचा विसर पडतो..माझ्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपण जाणता.. तरी देखील मी माझी मागण्याची सवय काही सोडत नाही..कारण जे माझ्यासाठी योग्य आहे ते तर तू देतच आहेस..देणारचं आहेस..पण मनाची सवय काही सुटत नाही..आम्हाला अशी बुद्धी दे की आम्ही प्रार्थनेत तुलाच मागू… मनाला नित्य तुझेच स्मरण व्हावे..मुखाने तूझे गुणगान होऊ दे…माझे मन नेहमी इतरच गोष्टी मागते..पण जिथे परमशांती आहे..स्व अनुभव आहे..ते मागत नाही..माझ्या मनाला तुझ्या नामावर स्थिर कर..कारण हे फक्त तूच करू शकतोस..कृपा कर समर्था..धन्यवाद समर्था.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!