अहंकार नसावा मनी !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४)

आजचे चिंतन-मनन

अहंकार नसावा मनी !
समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !!
कर्ता करविता एकच समर्थ स्वामी !
ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !!

www.SwamiVaani.com

वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे पुन्हा आपल्या मनावर प्रहार करण्यात आला आहे.. आपले मन नेहमी मी.. मी चा पाढा म्हणत असते.. मी देवाचे इतकी सेवा करतो.. मी कुटुंबासाठी इतके करतो.. मी चा अहंकार आपल्या जीवनात इतका असतो कि.. आपणस असे वाटते कि मी करतो म्हणूनच होत आहे.. पण खरंच विचार करा आपण नव्हतो तेव्हा हि सर्व सुरु होते… मी नसेल तेव्हा हि सर्व सुरु असणारच आहे.. मग माझ्यातील मी काम करतो कि.. माझ्या द्वारे काम करून घेणारी दुसरी शक्ती आहे.. नक्कीच यावर चिंतन मनन कर.. म्हणजेच इथे स्वामी आपल्या तील अहंकारावर मात करण्यास सांगत आहेत.. अहंकार कमी झाला कि आपण जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करा… जसे आज दिवसभर जे काम केले असेल.. स्वामी सेवा केली असेल ती सर्व स्वामींना अर्पण करा.. स्वामी ना म्हणावे धन्यवाद माझ्याकडून सेवा करून घेतलीस.. म्हणजेच इथे समर्पित भाव आपणस जागृत करायचा आहे… सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे.. स्वामीच कर्ता आहेत मी फक्त निमित्त आहे… हा विश्वास आपणस आपल्यात अंतर्मनात जागृत करायचा आहे.. चला मग आज आपल्यातील अहंकारावर काम करूया .. धन्यवाद समर्था .. !

 


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...