पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

Sep 9, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...