स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

Dec 16, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले आणि कृष्णाजी पाटील यांना म्हणाले आम्ही अनेक तीर्थ यात्रा करून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रम्हगिरी सुद्धा आहेत.. आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत आमची सेवा करावी..आपण त्या महाराजांची सेवा करता अहो त्या पेक्षा आमची सेवा करा.. त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाजी एवढेच म्हणाले कि आज तर आमच्याकडे भाकरी आहेत त्याचा स्वीकार करा उद्या शिरा पुरी देऊ..संध्याकाळी ब्रम्हगिरी बुवा नी प्रवचन सुरु केले अनेक वस्ती वरचे लोक प्रवचन ऐकण्यास आले होते.. त्यांनी प्रवचनास भगवद गीतेचा श्लोक घेतला ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ त्यावर निरूपण करू लागले.. त्यांचे निरूपण ऐकून लोकांना काही समजत नव्हते कि महाराज काय सांगत आहेत.. त्या मुळे सर्व लोक उठून श्री गजानन महाराजांकडे गेले.. हे सर्व पाहून गोसाव्याला राग आला.. तेव्हा श्री महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते.. अचानक चिलिम मधील एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंगानी पेट घेतला.. हे सर्व पाहून तेथील लोक घाबरले आणि श्री महाराजांना खाली उतरण्याची विनवणी करू लागले.. भास्कर पाटील पाणी आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा महाराज म्हणाले अजिबात पाणी आणू नकोस.. हा सर्व प्रकार ब्रम्हगिरी सुद्धा पहात होते.. तेव्हा महाराज म्हणाले ब्रम्हगिरी महाराज या बसा माझ्या शेजारी पलंगावर बसा..आताच तुम्ही सांगितले ना.. ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ श्री महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले जा घेऊन या बुवांना या पलंगावर..हे ऐकून बुवा घाबरले आणि पळून जाऊ लागले पण भास्कर पाटील यांनी त्याला पकडले आणि महाराजांकडे घेऊन आले.. महाराज त्यांना म्हणाले अहो आपण जो श्लोक सांगितले त्यावर जे विवेचन केले ते कृतीतून करून दाखवा..बसा या पलंगावर.. तेव्हा बुवा म्हणाले महाराज मला माफ करा.. मी पोट भरू संत आहे.. शिरा पुरी खाण्यासाठी मी संत झालो आहे..लोकांनी महाराजांना विनंती केली आपण खाली उतरा.. महाराज उतरे पर्यंत सर्व पलंग जळून गेला होता केवळ महाराज बसले होते तेवढा भाग मात्र चांगला होता.. ब्रम्हगिरी बुवा महाराजांच्या चरणी लीन झाले.. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला.. जर आपणस स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये.. बुवाला आपली चूक समजली तो.. महारांजाच्या चरणी लीन झाला.. अश्या रीतीने ब्रहागिरी बुवा विरक्त झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

बोध- वरील लीलेतून महाराज आपणस खूप खोल असे मार्गदर्शन करत आहे.. पहा अनेकदा आपणस एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसताना आपण असे दाखवतो कि मला खूप माहिती आहे.. हि गोष्ट अध्यात्म अनेकदा घडते..आपणस या गोष्टी पासून दूर राहायचे आहे.. तसेच आज आपण पाहतो कि अनेक जण अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आपणस असे वाटते कि हा बरोबर तो चूक.. खरंतर आपणस कुणा वर टीका करायची नाही पण आपणस जागृत राहून ईश्वर सेवा करायची आहे.. कारण अनेक ब्रह्मगिरी बुवा आहेत.. आपणस श्री महाराजांची लीला आपल्या जीवनसाठी मार्ग दर्शन करत आहेत.. अनेकदा आपले असे होते कि बुवा प्रमाणे आपणास अनेक स्तोत्र मंत्र पाठ असतात.. आपल्यात अहंकार निर्माण होतो.. खरंतरं जो पर्यंत आपली आंतरिक शुद्धी होत नाही तो पर्यंत आपणास खरे ज्ञान मिळू शकत नाही.. त्या मुळे आपणस अनेक गोष्टी मध्ये न अडकता.. सहज सोपी साधना करायची आहे.. जसे रोज नाम जप करा.. शक्य असेल तर रोज एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ वाचा.. आणि नुसता ग्रंथ न वाचता.. श्री महाराजांना प्रार्थना करा आम्हाला मार्गदर्शन करा.. पहा ज्या प्रमाणे बुवांना मार्गदर्शन मिळाले तसे आपणस हि मिळावे.. हाच बोध होतो.. बोला श्री गजानन महाराज कि जय.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया.. श्री महाराज ज्या प्रमाणे आपण ब्रम्हगिरी बुवाना योग्य मार्ग दाखवला.. आणि सत्याचे ज्ञान प्रदान केले.. असे ज्ञान आम्हाला प्रदान करा.. आम्हाला ज्ञानी नाही तर समर्पित भक्त बनवा.. आम्हाला इतर गोष्टीत न अडकण्याची बुद्धी द्या.. आपल्या नाम सेवेची सेवा द्या..बाकी काहीच नको.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...