समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले .. बोला उमा महेश्वर देवता कि जय
बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!
प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..