प्रार्थना कोणती पूर्ण होते

Sep 22, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड आहे.. कारण प्रत्येकाच्या या बाबत वेगवेगळे मत आहेत.. पण आपण जर अनेक प्रार्थना पाहिले तर आपणस जाणवते कि.. प्रार्थना हि नेहमी विश्व कल्याण करणारी असते हे आपणस जाणवते..आपण अनेकदा व्यक्तिगत प्रार्थना करतो.. त्या पूर्ण होण्यास वेळ लागतो.. पण जेव्हा आपण सर्व समावेशक म्हणजेच अव्यक्तिगत प्रार्थना करतो तेव्हा ती लवकर पूर्ण होते.. जसे पसायदान आपण जर या वर चिंतन मनन केले तर आपणस जाणवेल माऊलींनी विश्वाचे कल्याण व्हावे या साठीच प्रार्थना केली आहे.. आपण प्रार्थना करताना ती कोणत्या भाषेत वा शब्दांत करतो या पेक्षा आपले भाव महत्वाचे आहेत..आपण रोज प्रार्थना करताना प्रयत्न करा कि सर्वांसाठी प्रार्थना करूया.. पहा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि सर्वांसाठी का ? पहा आपल्या सर्वांचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. पहा समजा माझा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे.. मी म्हंटल कि माझा चालू दे.. तर हि प्रार्थना अपूर्ण आहे.. कारण माझा व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे.. ग्राहक तेव्हाच येईल जेव्हा त्या कडे पैसे असतील.. त्या कडे तेव्हाच पैसे येतील जेव्हा तो जिथे नोकरी करत असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत असेल.. म्हणजेच प्रत्येकाचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. जर इतर सुखी होतील तरच आपण हि सुखी होऊ शकतो.. म्हणून मला प्रार्थना करताना अशी करावी लागेल कि.. सर्वांचा व्यवसाय , नोकरी मध्ये यश प्राप्त होऊ दे.. म्हणजेच प्रार्थना व्यक्तिगत न राहता.. विश्वकल्याणाची होईल.. आपणस जी काही प्रार्थना सुचते ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा.. पहा आपल्याच प्रार्थना भविष्यात आपणस प्रेरणा देतील.. चला तर मग आजपासून आपल्या प्रार्थना बदलूया.. आपले जीवन बदलूया.. धन्यवाद स्वामी..!
या बाबत आपले अभिप्राय आपण आम्हाला – chetnakeswar.com@gmail.com यावर पाठवू शकता


Share
और पढिये !!

ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो

ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो.. लेकिन हमारा मन समस्या आने के डर से या विचारों के कारण हम यह सब भूल जाते है.. चलो आज हम स्वामी वाणी के माध्यम से इसको समझते है.. श्री स्वामी समर्थ महाराज के भक्त बसप्पा नाम के भक्त थे.. उनकी स्वामी चरणों...

शिव लिंग पूजन के लिए कैसा शिव लिंग हो

  सर्वप्रथम महादेवजी के लिंग का पूजन श्री ब्रम्हदेव और विष्णु देव इन्होने किया वह दिन महाशिवरात्रि का दिन था.. इनकी पूजा से महादेव जी प्रसन्न हुवे और उन्होंने यह वर दिया की इस दिन जो भी कोई शिव पूजन करेंगे उन्हें पुरे साल सेवा करने का फल प्राप्त होगा..शिव पुराण...

शिव पुराण कथा 6

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे...आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग...

शिव पुराण कथा 5

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक,...

शिव पुराण कथा ४

शिव पुराण कथा 4 शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात...

शिव पुराण कथा ३

शिव पुराण कथा 3 आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते...पार्वती...

शिव पुराण कथा २

  समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते...तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते....ते खूपच वाईट होते...त्यांचे मन दूषित होते...कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते...त्या गावात एक बिंदुग नावाचा...

शिव पुराण कथा १

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.....

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...