तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

आजचे चिंतन-मनन

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !
शरण आलो तुला !!
‘मी’ पणाच्या जाळ्यात,मन हे फसले !
मुक्त कर तू मला !!

स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपला मी पणा वर येतो.. मी अमुक करतो म्हणून हे घडते.. मी सेवा करतो… खरंच आपण करतो म्हणूनच सुख मिळते का? म्हणजे आपणच सुख कारक आहोत का? चला आता यावर विचार करू मग दुःख आल्यावर का बरं आपण म्हणतो कि मी फार कष्ट केले पण मला यश आले नाही..नशिबात नव्हते.. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपणस दैववादी वा अंधश्रद्धा वादी नाही बनायचे पण आपणस कर्म करून विसरून जायचे आहे.. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत आपल्यात मी पणा आपणस आणायचा नाहीये.. म्हणजेच आपणस कर्ते पणा स्वामींना अर्पण करायचा आहे.. पण आपल्यातील हा मी पणा कसा दूर होईल तर.. हा मी पण दूर करण्यासाठी आपणस आपल्या विचारांचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.. विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा पण त्या विचारांना योग्य ती दिशा देणे महत्वाचे आहे.. हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विचारांना स्वामी नामावर स्थिर करायचे आहे..स्वामी नाम सेवेत सातत्य आणायचे आहे.. या सर्व गोष्टीसाठी आपणस स्वामींना आपल्या शब्दात प्रार्थना करणे आवश्यक आहे.. कारण प्रार्थना जेव्हा ह्रद्यातून येते तेव्हा त्यात आवश्यक भक्ती भाव उतरतो.. चला तर मग स्वामींनाच प्रार्थना करूया– हे समर्था तूच सुखकारक आहेस.. तूच दुःख विनाशक आहेस.. पण माझे मन नेहमी मी पणा मागते.. कृपा कर माझ्यातील मी पणाचा भाव दूर कर.. माझ्यातील मी पणा जोपर्यंत तुझी कृपा होत नाही तोपर्यंत तो दूर होऊ शकत नाही..मला मी पणा च्या जाळ्यातून मुक्त कर.. कारण हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !!


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...