श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

Oct 26, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

महिमा राम नामाचा – श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत… सर्वप्रथम राम नामाला वंदन असो… खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे… हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि भगवंताचे प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.. नाही तर काय होते आपण तुलना करत बसतो… पहा श्री वाल्मिकी ऋषींनी राम नाम उलटे घेतले म्हणजे त्यांनी राम.. राम जप करण्याऐवजी.. मरा.. मरा असा जप केला तरीहि नाम जपाच्या प्रभावाने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले हे आपण सर्व जाणताच.. राम नाम जपाने आपल्यात भक्ती जागृत होते.. याचा जप करणे खूप सोपे असे आहे.. कुठेही आपण जप करू शकतो.. याला काळ ,वेळ, स्थळ याचे बंधन नाही.. नाम जपा मुळे इहलोकी तर कल्याण होतेच पण त्याच प्रमाणे परलोकतही आपले कल्याण होते.. जीव आणि ब्रम्ह यांची अनुभूती घेण्याचा मार्ग म्हणजे नाम सेवा… आपली जीभ जशी चांगली चव हवी असते तसेच एकदा आपल्या जिभेला राम नामाची चव लागली कि मग इतर कोणत्याच चवीची अपेक्षा राहत नाही… तुलसी दास महाराज म्हणतात राम नामाची दोन्ही अक्षरे हि अत्यंत श्रेष्ठ अशीच आहेत..आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो कि राम नाम व प्रभू श्री राम हे एकच आहेत कि वेगळे आहेत ? याचे उत्तर आहे ते एकच आहेत.. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि मग नामच का घ्यावे… याचे उत्तर देताना तुलसी दास महाराज म्हणतात पहा एखादा सेवक असतो तो आपल्या स्वामींच्या मागेच असतो तसाच जिथे नाम तिथे श्री राम… थोडक्यात भगवंत हे नामाच्या आधीन असतात.. पहा आपणास कोणत्याही वस्तूचे स्वरूप समजण्यासाठी तिचे नाव माहित असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण तिला ओळखू शकत नाही तसेच राम नामाशिवाय आपण रामाला ओळखू शकत नाही… सगुण असो वा निर्गुण असो स्वरूप समजण्यासाठी नामच मार्ग आहे… तुलसीदास महाराज म्हणतात जर आपणस आंतर्बाह्य प्रकाश हवा असेल तर आपणस आपल्या मुखात कायम राम नामाचा वास असणे आवश्यक आहे… नामाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते… वेद सुद्धा नामाचा महिमा गातात.. कलियुगात ईश्वर सेवेचा सर्वात सुलभ सोप्पा मार्ग म्हणजे नाम सेवा… नाम म्हणजे सर्व काही… नाम हे सर्वव्यापक आहे.. भगवंताचा निवास आपल्या हृदयात आहे.. त्याचे दर्शन हे नाम जप सेवेने सुलभ होते.. राम नाम हे रामपेक्षा हि मोठे आहे… नामाने आपला उद्धार होतो… आपले आचार विचार यांत बदल होतो… आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नाम रुपी सेवा… आपल्या मनास पवित्र करण्याचे साधन राम नाम… सेतू बांधताना राम नाम रूपीच सेतू बांधावा लागला व तो तयार झाला हे आपण सर्वच जांणतोच म्हणजेच यशाचा सेतू म्हणजे राम नाम… थोडक्यात निर्गुण निराकाच्याही पलीकडे जे काही आहे ते राम नाम थोडक्यात श्री रामांना जाण्याचं असेल तर राम नामाशिवाय ते शक्य नाही म्हणून आपणस राम नाम घ्यायचे आहे.. !
बोध – वरील नाम महिमा यावर आपण चिंतन मनन केले तर आपणस नक्कीच हा बोध होतो कि… सर्वांत सुंदर.. सोपी ईश्वर सेवेचा मार्ग म्हणजे नाम जप रुपी सेवा.. हि सेवा आपण जितकी अधिकाधिक करू तसे आपल्यातील वृत्ती, विषय , विकार नाश होतील.. नक्कीच आपणस त्यावर चिंतन मनन करून आपल्यातील जे दोष दिसत आहेत.. ते हळू हळू करून नष्ट करायचे आहेत… या साठी आपणस नाम रुपी सेवा मदत करणार आहे.. फक्त यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणस सेवेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.. चला तर आज पासून नाम रुपी सेवेस सुरवात करूया


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...