डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

Sep 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

  • आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये…खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का… असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे स्वामींचे सेवेकरी आहेत ज्यांनी आज पर्यंत अखंड निस्वार्थ सेवा केली आहे..आपणस स्वामीं वाणी ही वेबसाईट तसेच अँप देखील माहीत असेल..या वर आपण स्वामीं वाणी ऐकली असेल..वाचली असेल..पण ही लिहिली कुणी..ही प्रसिद्ध कोण करत आहे..हे आज पर्यंत काही मोजक्याच लोकांना माहीत आहे..आपण म्हणाल की मग यात काय झाले ? एक स्वामी वाणी प्रसिद्ध झाली की ती लाखो लोक ती वाचत होते..श्रवण करत होते..वेबसाईट Views सुध्दा लाखो.. जर याचा हिशोब केला तर या माध्यमातून ते वार्षिक लाखो रुपये कमवू शकत होते पण..स्वतःला शब्द दिला होता स्वामीं सेवेचे बाजारी करण करणार नाही..अशी ही निस्वार्थ सेवा अखंडपणे ३.५ वर्ष सुरु होती..साधारण ३०९ भागांची स्वामीं वाणी वेबसाईटवर उपल्बध होती..पण अचानक काही गोष्टी झाल्या..कुठंतरी वाटले की स्वामीं लिलामधून काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत.. मग विचार आला..आपले काम स्वामी सेवा करणे आहे..आपले मत इतरांवर लादणे नाही..क्षणाचाही विचार न करता त्यांनी सर्व स्वामीं वाणी संग्रह अर्चिव केला..विचार निस्वार्थ होता..अनेकांनी उत्पन्न कमावले.. पण ते स्वामी विचारांचा प्रचार करत होते म्हणून आणि चांगलं कार्य कार्य करत होते म्हणून त्यानां सुद्धा परवानगी दिली.. उत्पन्न महत्वाचे नाही तर स्वामी विचार महत्वाचे आहे हा मुद्दा महत्वाचा..
  • या जागी माझ्यासारखी व्यक्ती नक्कीच नाही म्हणाली असती अथवा मला काहीं मोबदला दे म्हणाली असते पण यांनी असे काहीच केले नाही..
  • मग विचार केला चिंतन मनन केले की स्वामीं सेवा तर थांबली नाही पाहिजे..मग स्वामीं वाणी चे नवीन पर्व सुरु झाले..दैनंदिन जीवनातील स्वामीं वाणी..म्हणजे आपणस अनेक प्रश्न असतात..त्यावर उत्तर मिळत नाही..अश्या प्रश्नांवर चिंतन मनन करून उत्तर मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे..ही सेवा सुद्धा निस्वार्थ सुरू आहे.. कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल..ही व्यक्ती गर्भ श्रीमंत असेल..हिला पैशाचे महत्त्व समजलं नसेल.. वेडी व्यक्ती..असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतील..अनेकांना जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांनी मला असेच उत्तर दिले..पण खरंतर ती व्यक्ती देखील सर्व सामान्यच आहे…प्रापंचिक आहे..तरुण आहे..कुटुंब चालवण्यासाठी १८-१८ तास काम करते..पण निस्वार्थ स्वामीं सेवेचा विडा उचलला आहे असे म्हणावे लागेल..आपण म्हणाल काय फायदा..अहो स्वामीं चा नियम आहे ते कुणाचेच काही ठेवत नाहीत..वेळ आली की व्याजासह परत..एक दिवस अचानक त्यांचे भयानक डोके दुखू लागले..डॉक्टर कडे गेले तर BP २८० झाला होता..ब्रेन स्ट्रोक चा अटॅक होता..प्यारलेसिस पासून ते जिवंत राहणे अशक्य होते.. परंतु दररोजची ध्यानधारणा आणि सर्वांच्या अप्रत्यक्ष आशीर्वाद ह्या मुळे तर काय.. डॉक्टर आश्चर्य चकित होऊन बोलले की, ‘तुम्ही अजून बोलत आहात यावर विश्वास बसत नाही..’ त्यांना ICU मध्ये ऍडमिट केले… परिस्थिती क्रिटिकल होती.. या परिस्थितीत सुद्धा या व्यक्तीने गुरूवार ची स्वामीं वाणी प्रसिद्ध केली.. त्यांना ऑडिओ करता आला नाही..त्याबद्दल त्यांनी स्वामीं भक्तांची माफी मागितली व कारण सांगितले..
  • *अहो ज्या माणसाचे नाव माहीत नाही..चेहरा माहीत नाही.* अश्या स्वामीं सेवेकरी बरा व्हावा यासाठी.. फेसबुक, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सएपच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक प्रार्थना केल्या..यात नाही म्हंटल तरी हजारो लोकांच्या सकारात्मक प्रार्थना काम करत होत्या..आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थना आणी डॉक्टरांचे प्रयत्न यातून मृत्यू वर मात केली..डॉक्टरांचे प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थनेचे बळ.. 72 तासाच्या आत डॉक्टरांनी सांगितले आता आपणस धोका नाही..आणि 7-8 दिवसांतच त्याना discharge मिळाला..ते सुख रूप घरी आले..अजूनही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.. पण धोक्याच्या बाहेर हेत..
  • हे सर्व काय होते तर निस्वार्थ स्वामीं सेवेचे फळ…एखादी व्यक्ती मृत्यु च्या दारात असून सुद्धा निस्वार्थ सेवा सुरू ठेवते मग त्याचे फल या पेक्षा मोठे ते काय असणार.. असो..यातून आपणस काय बोध मिळतो..आपले प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने करा..मग ती स्वामीं सेवा असो वा..आपण करत असणारी नोकरी.. धंदा असो तो जेव्हा आपण एक स्वामीं सेवा म्हणून करू तेव्हा नक्कीच स्वामीं महाराज आपणस भरभरून देतात..दुसरे आपले थोडे फार दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टर कडे जा ..त्यांचा सल्ला घ्या.. मनाने किंवा इतरांचे ऐकून उपचार करू नका..शरीराची काळजी घ्या कारण हेच जेव्हा आपण याची काळजी घेऊ तेव्हा ते देखील आपली काळजी घेणार आहे..निस्वार्थ स्वामीं सेवा करा..मेवा नक्कीच मिळेल..या सर्व अनुभवात आज त्या निस्वार्थ सेवेकरी चे नाव सांगणे अपरिहार्य आहे पण त्यांनी स्वामीं सेवेकरी हीच ओळख कायम असावी ही इच्छा व्यक्त केली….!
    नक्कीच अशीच प्रेरणात्मक सेवा तुमच्या द्वारे व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना..धन्यवाद स्वामीं
    ,”काही जण असेही बोलतील की,स्वामींचीच कृपा होती तर मग डॉक्टर कडे कशाला गेला? आशा लोकांना सांगावेसे वाटते की, डॉक्टरांना सुद्धा देवानेच बनवले आहे.. आणि क्वांटम फिसिक्स च्या नियमांने सर्व लोकांच्या सकारात्मक प्रार्थना- तरंगाचा प्रभाव उपचारात सहकार्य करत असतो.. म्हणून दवा आणि दुवा ह्याचे महत्व आहे..😊”

Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...