नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

May 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया

हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर सुद्धा मृत्यू येऊ नये ,  असा वर त्याने प्राप्त करून घेतला. हा वर प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला अजरामर समजू लागला त्याला वाटू लागले कि मीच देव आहे मीच सर्व शक्तिमान आहे  हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता मुलगा नेहमी  नामस्मरणात तल्लीन असत.  हे पाहून हिरण्यकश्यपू राजा ला फार राग येई त्याने आपल्या मुलाला खूप समजून सांगितले कि तू माझा जप कर मीच देव आहे.  पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या नाम सेवेत तल्लीन असे हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू  ला फार चीड येऊ लागली आणि त्याने  त्याला समजून सांगण्यासाठी त्याला शिक्षा केली पण तरी देखील प्रल्हाद विष्णूची नाम रुपी सेवा करणे सोडत नाही .मग मात्र हिरण्यकश्यपू  चा राग वाढला आणि त्याने शिपायांना प्रल्हादाला डोंगरावरून खाली ढकलून देण्यास सांगितले तरी देखील प्रल्हादाला काहीच इजा पोहचली नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूपच राग आला आणि त्याने शिपायांना उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा दिली शिपायांनी प्रल्हादाला तेलात टाकले तर शिपायांना भाजले पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. उलट प्रल्हाद नाम रुपी सेवेत तल्लीन होता .हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादला विचारला कि कुठे आहे तुझा ” नारायण नारायण ” दाखव मला कुठे आहे .तुझा भगवान विष्णू  बोलव त्याला तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझा देव सर्वत्र आहे. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझा देव आहे .आपण फक्त हाक मारा मग रागाच्या भरात  हिरण्यकश्यपूने विचारले कि या खांबात तुझा देव आहे का ? तेव्हा प्रल्हाद म्हणाला हो या खांबात माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ने रागाच्या भरात लाकडी खांबाला लाथ मारली तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह रूपात खांबातून बाहेर आले.  नृसिंह रूप पाहून हिरण्यकश्यपू खूप घाबरला .भगवान विष्णूं नृसिंह यांनी  हिरण्यकश्यपू ला मांडीवर घेतले व दाराच्या उंबऱ्यावर बसले ती वेळ होती सायंकाळची म्हणजे दिवस हि नव्हता रात्र हि नव्हती उंबरा म्हणजे घर हि नाही व घराच्या बाहेर हि नाही न कोणते शस्त्र न काही अस्त्र भगवान नृसिंह यांनी घराच्या उंबऱ्यावर नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून मुक्त केल अश्या प्रकारे भगवान विष्णूचा  नृसिंह अवतार झाला सर्वांनी एक घोषात ” नारायण नारायण ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” नामाचा जय घोष केला

 

बोध – नृसिंह अवतार हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अवतार आहे. खरे तर हा अवतार म्हणजे आपणस आपला बोध करण्यास प्रेरणा देणार अवतार .चला आपण यावर चिंतन मनंन करूया, हिरण्यकश्यपू राजा होता .तो देखील देवाची सेवा करत होता व त्याने सेवा करून वर प्राप्त केला कि मला कधीच मरण येऊ नये खरे तर इथे आपणस आपल्यातील हिरण्यकश्यपू शोधायचा आहे कारण अनेकदा आपणस देखील विस्मरण होते कि आपण या पृथ्वी वर पाहुणे आहोत आपण अशा अविर्भावात जगतो कि मी अमर आहे. आजच्या लीलेतून आपणस बोध घ्यायचा आहे , कि मी देखील पाहुणा आहे .जे काही आयुष्य मला प्राप्त झाले आहे त्याचा मी सदुपयोग करेल जेणेकरून माझ्यातील हिरण्यकश्यपू मरून जाईल .भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता इथे आपणस भक्त प्रल्हाद यांच्या कडून नाम रुपी सेवेचे महत्व समजत आहे .समस्या कोणतीही असो आपणस नाम रुपी सेवा सुरु ठेवायची आहे. जसे भक्त प्रल्हाद यांना नृसिह यांनी तारले तसेच आपणास देखील आपली जी कोणती इष्ट देवता आहे ती तारणार आहे .आवश्यकता आहे केवळ अखंड नाम सेवेची इथे आपणस वाटते कि   हिरण्यकश्यपू हे वाईट होते खरे तर ते सुद्धा देव भक्त होते पण त्यांच्यात अहंकार निर्माण झाला होता व तो दूर करण्यासाठी  नृसिंह  अवतार झाला म्हणजेच आपल्यातील हिरण्यकश्यपू चा नाश व्हावा यासाठी अवतार झाला आहे .आपणस त्यावर काम करायचे आहे आणि खरी नृसिंह  जयंती साजरी करायची आहे व आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे.

चला आपण सर्व जण भगवान नृसिंह यांना प्रार्थना करूया – हे नृसिंहा तुझा नृसिंह अवतार म्हणजे आम्हाला आमच्या तील विकारांवर काम करण्यास प्रेरणा देणारा अवतार.. आमच्यातील हिरण्यकश्यपू चा नाश कर.. कारण खरा हिरण्यकश्यपू आमच्यात आहे… पण आम्ही तो फक्त तुझ्या गोष्टीत शोधतो.. खरेतर आमच्यातील हिरण्यकश्यपू नाश होणे गरजेचे आहे… आणि तो तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही… आम्हाला भक्त प्रल्हादा सारखी भक्ती दे… आमच्या कडून तुझी नाम रुपी सेवा करून घे… आम्हाला तुझ्या नामात स्थिर कर… आणि आमचे आयुष्य रोजच नृसिंह जयंती मय बनव… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद…  सर्वांना नृसिंह जयंती च्या खूप खूप शुभेच्छा

 


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...