हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७)

अमृत वचन

हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो… आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…आपणस अनेक प्रश्न असतात..अडचणी असतात त्याची उत्तरे आपणस मिळत नाहीत..मग आपण ते प्रश्न इतरांना विचारतो.. उदाहरणार्थ मला आर्थिक समस्या आहे..मग मी काय करतो..अनेक लोकांना विचारतो की माझी समस्या कशी सुटेल..मग समोरची व्यक्ती काही तरी सांगते ते आपण करतो..कधी यश येते.. कधी अपयश येते..पुन्हा आपण आपला प्रश्न घेऊन अजून कुणाकडे जातो…तो आणखी काहीतरी सांगतो..परत आपला प्रवास सुरु होतो..पण आपण कधीच स्वतः ला त्या प्रश्नांची उत्तरे विचारत नाही..कारण आपणस स्वतःला प्रश्न विचार असे कधी कुणी सांगत नाही..आज स्वामीं आपणास सांगत आहेत..हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! ह्रदयाचा आवाज म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेऊ…विचार हा एक असतो पण.. जे सतत येत जात असतात ते विचार..दुसरे विचार असतात जे आपण शांत असताना येतात त्याला आपण हृदयाचा आवाज म्हणतो.. ..जेव्हा आपण आपल्या आता डोकावतो..कोणताही निर्णय घेताना शांत होतो..सर्व विचार सोडून आपले मन आपल्या ह्रदयावर केंद्रित करतो..मन भटकंती करते..पुन्हा आपण त्याला ह्रदयावर आणतो..याला म्हणतात ह्रदयावर जाणे..हा एक अभ्यास आहे..जो प्रत्येकाने केला पाहीजे…या साठी रोज थोडा वेळ बसा.. सुरवातीला कंटाळा येईल..नंतर आवड निर्माण होईल..आपल्या मनात प्रश्न आहे..तो प्रश्न स्वामीं ना सांगा..स्वामीं आपण तर सर्व जाणताच कृपा करा मला ह्रदयातून मार्गदर्शन करा..प्रार्थना झाली की..डोळे झाका..स्वामीं समोर बसा..मनात विचार येतील..येऊ द्या..विचार आले तसे जातील..आपणस मनाला आपल्या ह्रदय स्थानावर आणायचं आहे..सुरवातीला ५ मिनिट प्रयत्न करा..नंतर ही वेळ १० , २० मिनिट करा..पहा काय काय उत्तरे आपणस मिळतात..आता यात महत्वाचे..आपणस मिळालेले उत्तर आहे की आपले नेहमीचे विचार आहेत हे तपासून पहा..जसे आर्थिक समस्या आहे..आणि आपल्याला उत्तर मिळत आहे..व्यवसाय कर ..पण हा विचार खरंच आपल्या हृदयातून येत आहे कि इतर करतात म्हणून मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे हे तपासून पहा.. जे काही विचार येत आहेत ते लिहून काढा.. त्यावर चिंतन मनन करा.. अश्या विचारांवर काम करायचे नाही..ज्या वर आपण अभ्यास केलेला नसेल.. आपणस सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे..कारण ह्रदयातून मिळणारे मार्गदर्शन हे..आपणस तर सुख..आनंद देतेच पण त्याच बरोबर ते समाज हितकारी असते.. रोज थोडा वेळ तरी आपल्या हृदय स्थानावर जा.. पहा नक्कीच स्वामीना अपेक्षित असणारी अभिव्यक्ती होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन ‘होकार’ देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे “नाही” बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !!

www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता गुण वाढवण्यास सांगत आहेत.. पहा विश्वसनीयता हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बोलतो.. पण हा गुण आपण इतरांकडून अपेक्षा करतो पण हा गुण आधी आपण विकसित करणे आवश्यक आहे. तो कसा विकसित करायचा हे स्वामींनी आपणस सांगितले आले.. पहिल्याच ओवीत स्वामी सांगत आहेत अरे एखादे कार्य आहे जे करणे आपणस शक्य नसेल तर स्प्ष्ट पणे नकार दे.. उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नकोस.. म्हणजे नेमकं काय तर आपण एका उदाहरणातून पाहू.. समजा आपणस कुणीतरी उसने पैसे मागत आहे.. आता ती व्यक्ती म्हणते मला १०० रुपये उसने देतोस का ? दोन तीन दिवसांत दिले तरी चालतील.. आपण त्या व्यक्तीला पैसे देत असू तर काहीच हरकत नाही.. पण कधी कधी आपण काय करतो आपणस देण्याची इच्छा नसते..पण त्याला वाईट वाटू नये यासाठी आपण देतो म्हणतो किंवा खोटं खोटं प्रयत्न करतो म्हणतो.. ती व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते.. आपण मात्र तिला पैसे देत नाही..जेव्हा दोन दिवसांनी आपण त्या व्यक्तीला सांगतो अरे शक्य नाही.. हेच आपण जर त्या व्यक्तीला पहिल्यांदाच सांगितले असते कि मला पैसे देणे शक्य नाही.. जेव्हा आपण नाही म्हंटलो तेव्हा कदाचित तिला वाईट वाटले असते पण त्या व्यक्तीला आपल्या बाबत भविष्यात विश्वास निर्माण होईल कि व्यक्ती जे म्हणते तेच करते.. इथे आपण अनेक उदाहरणा द्वारे हि स्वामी वाणी समजून घेऊ शकतो.. थोडक्यात आपल्या बोलण्यात मृदु भाषेत स्पष्टपणा असावा.. हा सप्ष्टपणा आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल..आपले संपूर्ण व्यक्तिमत्व हे विश्वसनीय असे बनेल.. धन्यवाद स्वामी .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. !

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)*

*आजचे चिंतन-मनन*

स्मरण तुझे मज नित्य असावे !
तव गुण भावे गावे !!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे…स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे मागतो..स्वामीं मला हे..ते दे..माझे अमुक काम कर..तमुक काम कर..स्वामीं आपण मागतो ते देणारच आहेत.. आणि आपण ही मगितलेच पाहिजे..पण आपण काय मागतो हे फार महत्वाचे आहे..आपल्या मागण्यात व्यवहारिक पणा नसावा..माझे अमुक काम कर मी हे करेल..अरे स्वामीं  आहेत ते ब्रम्हांड  नायक त्यांना आपण काय देणार..दयाचे असतील तर आपल्यातील अवगुण स्वामीं चरणी  अर्पण करा.. मागायचे असेल तर..स्वामींनाच का मागू नये..स्वामीं तुम्ही माझे आहात..पण मला नेहमी याचा विसर पडतो..माझ्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपण जाणता.. तरी देखील मी माझी मागण्याची सवय काही सोडत नाही..कारण जे माझ्यासाठी योग्य आहे ते तर तू देतच आहेस..देणारचं आहेस..पण मनाची सवय काही सुटत नाही..आम्हाला अशी बुद्धी दे की आम्ही प्रार्थनेत तुलाच मागू… मनाला नित्य तुझेच स्मरण व्हावे..मुखाने तूझे गुणगान होऊ दे…माझे मन नेहमी इतरच गोष्टी मागते..पण जिथे परमशांती आहे..स्व अनुभव आहे..ते मागत नाही..माझ्या मनाला तुझ्या नामावर स्थिर कर..कारण हे फक्त तूच करू शकतोस..कृपा कर समर्था..धन्यवाद समर्था.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)*

*आजचे चिंतन-मनन*

स्वामी स्वामी जप करता,
स्वामी भेटे भोळ्या भक्ता !
ऐसा माझा देव भोळा,
मात्र नाम घेता,घेतो धावा !!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून घ्या..स्वामी स्वामी जप करता..इथे स्वामीं नाम घेण्याचा बोध होतो..आता यात ही आपले मन म्हणते किंवा कुणी तरी सांगते असाच जप करा..हाच जप करा..कुणी स्वामीं..स्वामीं जप करेल..कुणी ओम स्वामी ओम म्हणेल..कुणी ओम श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी गुरुदेव म्हणेल..कुणी श्री गुरुदेव दत्त म्हणेल..जप कोणता करतो यापेक्षा..मुखात नाम येते हे खूप मोठी स्वामीं कृपाच आहे…आता स्वामी नाम तर घेतो..पण मग कुणी म्हणतो असेच घ्या..ही माळ वापरा, इथेच जप करा, अमुक इतकाच जप करा..असे केले तर असे होते..म्हणजेच सेवा बाजूला राहते आपण..नको त्या तांत्रिक, यांत्रिक, शुभ , अशुभ, चूक बरोबर यातच अडकतो..म्हणजेच त्या परब्रह्म चे नाव घेतानाही अनेक आपण आपल्या बुद्धी चे तर्क वितर्क लावतो..खरंतर स्वामीं ना भोळा भक्त आवडतो..काहीच करत नाही पण आपला अहंकार, स्वामीं चरणी अर्पण करतो..त्याला फक्त स्वामीं नाम दिसते.. स्वामीं भक्ती दिसते..बाकी काहीच त्याला समजत नाही..बाकी कोणत्या गोष्टी त तो अडकत नाही.. स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म म्हणजे स्वामीं सेवा असे ज्याला वाटते तो स्वामीं चा प्रिय भक्त असतो..कारण आपले स्वामीं ही भोळे आहेत..पहा अंगावर वस्त्र आहे का ? फक्त लंगोट आहे..स्वामीं ना आपल्या कडून काहीच नको आहे..हवी आहे ..प्रामाणिक स्वामीं सेवा, प्रामाणिक कर्म..म्हणजेच आपण जे काम करतो त्यात सुद्धा स्वामींना प्रामाणिकपणा हवा आहे..पहा जर हा गुण आपण आपल्यात धारण करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच स्वामीं कृपेचा वर्षाव होतो..फक्त गरज आपल्यात भोळा भक्ती भाव निर्माण होण्याची..इथे एक गोष्ट कदाचित आपल्या मनात येईल..भोळा भक्ती भाव म्हणजे अंधश्रद्धा.. असे नसून आपणस डोळस स्वामीं भक्ती करायची आहे…म्हणजेच आपणस आपले कर्म १०० % स्वामीं सेवेचा भाव ठेवून करायचे आहे ..कर्म करत असताना आपणस कुणी फसवत नाही ना याचेही भान आवश्यक आहे..कारण स्वामीं ना अंधश्रद्धा बाळगणारे सेवेकरी नाही आवडत..कर्मावर प्रामाणिक श्रद्धा असणारा भक्त आवडतो..आपणस स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे..धन्यवाद स्वामीं..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*

*आजचे चिंतन-मनन*

परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in

स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!