अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

Dec 10, 2024 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि तितक्यात चमत्कार झाला कृष्णाप्पाने हालचाल केली आणि जिवंत झाला.. सर्वांनी आनंदाने स्वामींचा जयजयकार केला ..धन्य स्वामी !! धन्य स्वामी लीला !! बोला स्वामी महाराज कि जय हो !!
स्वामी भक्त हो..अनेकदा आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की आपण हताश होतो..आपणास असे वाटते की सर्व काही संपले आहे…आपण शरीराने असतो..पण मनाने हताश झालेले असतो…खरतर अश्या वेळेस आपणास मनाला सांगता आले पाहिजे…किंबहुना आपल्या अंतर्मनात हे रुजवावे… जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा..वरील लीला वाचताना श्रवण करताना आपणास अनेक प्रश्न निर्माण होतात…असे कसे…पण आपण जेव्हा आपण श्रध्दा पूर्वक या लीले कडे पाहू तेव्हा आपणास जाणवते..की ही लीला आपल्या साठी आहे…संकट किंवा अडचण असते तेव्हा आपली अवस्था ही मृत कृष्णप्पा सारखी असते..आपण शरीराने जिवंत असतो..पण मानसिक दृष्ट्या मृत असतो…अश्या वेळेस आपणास काय करायचे आहे..चोळप्पा महाराज प्रमाणे स्वामी चरणी लीन व्हायचे आहे…मुखी स्वामी नाम घ्यायचे…आणि मनाला तारक मंत्राची आठवण करून देत…प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे..एकदा आपले मन जिंकले की आपण ही कृष्णाप्पा प्रमाणे आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाना सामोरे जावू आणि यशस्वी होऊ…म्हणजेच मृत्यु येण्यापूर्वी आपण मरणार नाही तर लढणार…(इथे महत्वाची गोष्ट..ज्या दिवशी आपला मृत्यू आहे तेव्हा तो येणारच आहे..फकत जिवंत पणी लढून जिंकायचे आहे…धन्यवाद स्वामी
संदर्भ: स्वामी वाणी ३
www.chetnakeswar.com

स्वामी भक्त हो..कितीही संकटं येऊ द्या..पण जीवंतपणे मनाने हरू नका…कारण स्वामी भक्त हरत नाही..तर लढतो आणि संकटाचा सामना करून यशस्वी होतोच… धन्यवाद स्वामी…!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

शिव लिंग पूजन के लिए कैसा शिव लिंग हो

  सर्वप्रथम महादेवजी के लिंग का पूजन श्री ब्रम्हदेव और विष्णु देव इन्होने किया वह दिन महाशिवरात्रि का दिन था.. इनकी पूजा से महादेव जी प्रसन्न हुवे और उन्होंने यह वर दिया की इस दिन जो भी कोई शिव पूजन करेंगे उन्हें पुरे साल सेवा करने का फल प्राप्त होगा..शिव पुराण...

शिव पुराण कथा 6

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे...आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग...

शिव पुराण कथा 5

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक,...

शिव पुराण कथा ४

शिव पुराण कथा 4 शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात...

शिव पुराण कथा ३

शिव पुराण कथा 3 आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते...पार्वती...

शिव पुराण कथा २

  समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते...तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते....ते खूपच वाईट होते...त्यांचे मन दूषित होते...कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते...त्या गावात एक बिंदुग नावाचा...

शिव पुराण कथा १

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.....

प्रार्थना कोणती पूर्ण होते

प्रार्थना - आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...