शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले होते.. एक दिवस तो फिरता फिरता उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्यात याचे पूर्वीच नाव प्रतिष्ठानपुर होते.. झूँसी गावात पाहोचला तिथे त्याला शिव मंदिर दिसले.. तिथे अनेक साधू संत .. शिव भक्त होते.. तिथे देवराज ला ताप आला होता.. तिथे शिव पुराण ची कथा सुरु होती..देवराज तिथे शिव कथा श्रवण करतो.. साधारण एक महिन्यात त्याचे निधन झाले.. तो यमलोकी जात असताना तिथे शिव गण येतात आणि त्याला कैलास वर घेऊन जातात.. त्यावेळेस धर्मराज सुद्धा हस्तक्षेप करत नाही.. असा हा शिव पुराण चा महिमा आहे.. हि कथा शिव पुराणात येते.. बोला उमा महेश्वर देवता कि जय.. !
बोध – खरंतर ईश्वराचे प्रत्येक चरित्र हे आपणस चित्त शुद्धी साठी महत्वाचे कारक असे असते पण आपण फक्त ते वाचतो ऐकतो आणि इतरांना सांगतो.. पण त्यातून आपणास काय बोध होतो हे महत्वाचे.. उपरोक्त लीलेत आपले आचरण हे शुद्ध असावे हा बोध होतो.. कारण आपले आचरण आपले जीवन दर्शवते.. त्या व्यक्ती कडे ज्ञान नव्हते पण असे दाखवत होता कि मी खूप ज्ञानी आहे.. कधी कधी आपणही हि चूक करतो आपणस अनेकदा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते आपण ते मान्य करत नाही उलट खोटे ज्ञान प्रदर्शित करतो.. हि चूक आपणस दूर करायची आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले म्हणजेच इथे आपणस प्रामाणिकपणे धन कमवायचे आहे.. थोडक्यात शिव पुराण कथा आपणस शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण देत आहे .. बोला उमा महेश्वर देवता कि जय
प्रार्थना – हे महादेवा.. देवराज यांना तू शिव पुराण कथेस निमित्त करून चित्त शुद्ध केलेस तसेच आमचेही चित्त शुद्ध कर.. आमचे चुकीचे आचरण दूर कर.. आम्हाला ज्ञानी बनव पण खोटे ज्ञान प्रदर्शित न करण्याची बुद्धी दे.. प्रामाणिक पणे धन कमवण्याची बुद्धी दे.. धन्यवाद समर्था .. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद..!