खरा कर्ता मी आहे का?

Feb 21, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

श्री स्वामी समर्थ
हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..!
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो.. आजच्या ओवीतून स्वामीं खूप खोल असा संदेश देत आहेत..तो म्हणजे आपल्यातील कर्ता भाव संपवण्यासाठी.. पहा आपणस वाटते की मी कमावतो म्हणून घर चालते..बायकोला वाटते मी घर सांभाळते म्हणून घर व्यवस्थीत आहे..हे जरी खरं असलं तरी आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी शक्ती आहे की नाही..जर आपण कंपनीत काम करता आणि आपणस वाटत असेल की मी इतके काम करतो..दुसरा करणार नाही..असे काही नसते हा आपला भ्रम आहे..मालकाला वाटते की मी काम दिले म्हणून याचे घर चालते..खरंतर दोघांनाही दोघांची गरज असते पण आपला खोटा अहंकार आडवा येत असतो…आपण नसतानाही या पृथ्वीवरील कार्य सुरू होते..नंतर ही सुरू राहणार आहे..कर्ता भाव हा आपणस अहंकारी, निराशा जनक बनवतो..जर या ऐवजी आपण विचार केला की मी जे काही करत आहे..ही एक स्वामीं ची सेवा आहे..ती मी प्रामाणिकपणे केलीच पाहिजे..बाकी कर्ता भाव स्वामीं ना अर्पण करा..पहा जीवनात काय चमत्कार ( आनंदी जीवन) होतात.!

चला आज स्वामींना प्रार्थना करूया..हे समर्था आमच्यातील कर्ता भाव नष्ट कर..जे काही आमच्या द्वारे कार्य होत आहे..यासाठी तूच तर प्रेरणा देतोस.. पण माझं मन म्हणते मी केले..आमच्यातील कर्ता भाव नष्ट कर..आमच्याकडून प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा या भावनेने करून घे..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद..!


Share
और पढिये !!

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...