लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

Feb 15, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)*

*प्रेरणादायी बोल*

एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ कर्म कर..उगाचच हा विचार करू नकोस की लोक काय म्हणतील..आपल्या सर्वांच्या मनात हा विचार घर करून बसलेला असतो की..मी हे कर्म केले तर लोक काय म्हणतील..अहो लोक काय म्हणतील या पेक्षा तुला काय वाटते..आपल्या स्वामीं ना काय वाटते हे महत्वाचे… अनेकदा एखादा कार्यक्रम असतो..लोक नाचत असतात..आपल्या मनात असते मी ही नाचावे..पण मनात विचार येतो..मी नाचलो तर लोक काय म्हणतील…अरे तुला आनंद मिळत आहे ना..तुझ्या आनंदाने कुणाचे नुकसान तर होणार नाही..स्वामीं ना तर कर्म आवडणारे असेल तर मग का विचार करतोस लोक काय म्हणतील.. लोक काय विचार करतील या विचाराने अनेक लोक आपले मन सुद्धा मोकळे करत नाहीत.. त्याचा परिणाम नको तिथे राग निघणे, कामात चुकी होणे असा होतो…अनेकदा आपण आपल्या मुलांनाही सांगतो.. अरे असे करू नकोस लोक काय म्हणतील? अहो या पेक्षा मुलांना सांगा तुला काय करावे वाटते हे मनसोक्तपणे बोल..त्याला बोलू द्या…त्यावर आधी चिंतन मनंन करा..जर अयोग्य असेल तर का अयोग्य आहे ते सांगा..पण कारण वास्तविक असावे..जर आपल्या मुलांचे म्हणणे बरोबर असेल.. तर लोक काय म्हणतील या पेक्षा ..ही गोष्ट याला करू न दिल्यामुळे त्याचे किती नुकसान होईल हा विचार करा..फक्त एकच गोष्ट करा..स्वामीं ना भूषणावह कर्म करा..पहा कसे आनंदी जीवन होतें..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...