जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३)

आजचे चिंतन-मनन

जावे स्वामींना शरण !
करावे स्वामी आज्ञेचे पालन !!
ह्यातच आहे आपुले कल्याण !
संशय न धरावा मनी !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ शकते..स्वामीं ना शरण जायचे..याचा अर्थ आपले प्रत्येक कर्म हे आपणस स्वामीं सेवा म्हणून करायचे आहे..म्हणजे आपले कर्म करताना आपणस १००% द्यायचे आहेत… स्वामीं आज्ञेच पालन करायचे आहे..म्हणजेच..आपणस जे कोणते काम मिळाले आहे..ती स्वामीं आज्ञा समजून करायचे आहे..ह्यातच आपले कल्याण आहे..पण हे सर्व करत असताना आपल्या मनात कोणताही संशय असता कामा नये..हीच स्वामीं सेवा आहे..म्हणजेच आपले नित्य कर्म प्रामाणिकपणे करणे ही स्वामीं सेवेची प्राथमिक अट म्हंटलं तरी चालेल..चला तर मग आजपासून आपण जे ही कर्म करतो ते प्रामाणिक पणे करूया..स्वामीं सेवा स्वामीं चरणी रुजू करू या..धन्यवाद स्वामीं

 


Share
और पढिये !!

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...