Share

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७)

कर्ता आणि करविता ।
तूचि एक स्वामीनाथा ।
माझिया ठाई वार्ता ।
मीपणाची नसेची ॥
– स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५०
www.SwamiVaani.com

वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात असणारा गुण आहे.. प्रत्येक गोष्टीत आपण आपले कर्ते पण दाखवत असतो.. मी हे काम केले म्हणून झाले.. मी स्वामींची सेवा करतो.. म्हणजेच आपल्यातील मी नेहमी जागृत असतो.. पण खरंच आज या वर आपण आपणस प्रश्न विचारायचा आहे कि खरंच मीच कर्ता आहे का? अहो झाडाचे पान देखील त्याच्या इच्छे शिवाय हालत नाही.. त्याची इच्छा नसेल तर आपल्या मुखात स्वामी नाम येत नाही..मग खरंच आपण कर्ता आहोत का ? जर खरंच आपण यावर चिंतन मनन केले तर आपणस उत्तर मिळेल कि नाही मी कर्ता नाही.. माझ्या मार्फत कार्य करणारी शक्ती आहे.. पण आपले मन मी पणा सोडत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मीच कर्ता आहे असे मला वाटते.. हे समर्था तूच कर्ता आहेस .. आमच्या मार्फत तूच प्रत्येक कार्य करवून घेतोस.. हि समज आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल धन्यवाद.. हि समज कायम असू दे हीच प्रार्थना.. जे काही कार्य तू माझ्याकडून करवून घेत आहेस.. त्यात माझ्या अंगी मी पणाचा अहंकार येऊ देऊ नकोस.. कारण आज मला समजले आहे जो पर्यंत तुझी इच्छा होत नाही तो पर्यंत कोणतेच कार्य होत नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… !!


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...