श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 19, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले… वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा… महाराजांची हि वाणी ऐकून सर्व सेवेकरी म्हणाले … महाराज आपण सांगत आहात ती सर्व सेवा आम्ही करू पण.. आपल्या गावात घनपाठी ब्राम्हण नाहीत… महाराज म्हणाले अरे तुम्ही तयारी करा… परमेश्वर स्वतः साह्य करतील .. नक्कीच ब्राम्हण मिळतील… सेवेकरी मंडळींनी सर्व तयारी केली… वर्गणी च्या माध्यमातून साधारण १०० रुपये जमा झाले.. वसंत पंचमी च्या पूजेची तयारी झाली… आता सर्व जण पुरोहितांची वाट पाहू लागले… इतक्यात अचानक काही घनपाठी ब्राम्हण महाराजांकडे आले.. त्यांनी महाराजांना काय सेवा करावी विचारले… तर महाराजांनी आपला मनोदय सांगितला… महाराजांची वाणी ऐकून ते पुरोहित खूप आनंदित झाले आणि त्यांनी वसंत पंचमी ची पूजा वेद घोषात सुरु केली… अश्या रीतीने महाराजांच्या वाणी नुसार पूजा संपन्न झाली… अजूनही बंकटलाल यांचे पूर्वज हि सेवा रुजू करतात… सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयघोष केला !!

बोध – वरील लीला आपणस खूप छोटी वाटते पण बोधाचा खजाना आहे… गुरु आज्ञाचे पालन कसे करावे याचा आपणस बोध होत आहे.. पहा वरील लीलेत श्री महाराजांनी आपला मनोदय सर्व सेवेकरी मंडळींना सांगितला… सेवेकरी मंडळी म्हणाले महाराज आपण सांगाल ती सेवा करण्यास आम्ही तयार आहोत… या ठिकाणी आपणस आपला सेवा भाव कसा असावा याचे दर्शन होते… महाराजांच्या वाणी नुसार सर्व सेवेकरी सेवा करण्यास तयार झाले… आणि साधारण १०० रुपये जमा झाले… त्या काळात १०० रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होय… सर्व सेवेकऱ्यांच्या मनात महाराजांच्या प्रति अतूट श्रद्धा व विश्वास भाव होता… महाराजांनी सांगितले आहे म्हणजे… घनपाठी ब्राम्हण येणारच… त्यासाठी सर्व लोकांनी देखील प्रार्थना केल्या असतील… त्या प्रार्थनेतील भाव देखील शुद्ध होता… त्या मुळेच अचानकपणे वेद पठण करण्यासाठी ब्राम्हण तेथे आले… या ठिकाणी महाराज देखील संदेश देत आहेत कि… पुरोहित म्हणजे जो दुसऱ्याचे हित इच्छितो तो… पुरोहित ( ब्राम्हण) आपणस देखील वरील लीलेचा बोध घेऊन गुरु आज्ञेचे पालन करायचे आहे… आणि महाराजांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे …!!

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया … हे समर्था आजची लीला म्हणजे आमच्या साठी गुरु आज्ञेचे पालन कसे करावे याची शिकवण दिलीत… त्या बद्दल धन्यवाद… अनेकदा आमचे मन आमच्या मना प्रमाणे वागण्याचा आग्रह करते… त्यात अनेकदा आमचे हित नसते… आम्हाला तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची बुद्धी दे… तसेच स्व हिता पेक्षा… सर्वांचे हित होईल असे कर्म करण्याची बुद्धी आम्हाला दे… हे आई हि प्रार्थना करून घेल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...