पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

पादसेवन भक्ती – श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि –

पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन ।
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे –
भगवंताच्या प्राप्ती साठी काया, वाचा, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करावी. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती !
नवविधा भक्ती मधील चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती । पादसेवन भक्ती चे रामदास स्वामींनी खूप विस्तार पूरक वर्णन दासबोध मध्ये केले आहे… वरील श्लोकातून महाराज  सोप्या भाषेत पादसेवन भक्ती चे वर्णन करत आहेत… सद्गुरूंचे पाय सेवावे… सद्गुरू आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे सद्गुरू असणार… श्री स्वामी समर्थ महाराज , श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली वा अन्य कोणते आपले सद्गुरू असतील… त्यांची काया… वाचा… मनोभावे सद्गुरूंची पाद्य सेवा करावी… काया म्हणजे शरीराने सेवा करायची … शरीराने सेवा म्हणजे आपणस काय शरीराला त्रास द्यायचा आहे का? नाही आपणस शरीर साक्षात परमेश्वर या भावनेने आपणस सेवा करायची आहे… कारण आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तरच आपण सद्गुरूंची सेवा करू शकतो… कारण शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपण कशी सेवा करणार… त्यामुळे आपणस सर्वप्रथम आपले शरीर सद्गुरु सेवेसाठी निरोगी ठेवणे आवश्यक आहे.. जेणेकरून आपण सद्गुरूंची जी सेवा असेल ती करू शकू… आता या ठिकाणी आपली जी वाचा आहे तिने सद्गुरु ची सेवा करायचा उपदेश इथे समर्थ करत आहेत… पहा हि वाचा आपणस उच्च स्थान पण देऊ शकते व नीच स्थान पण देऊ शकते… आपण तिचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून आहे… आता वाचेने सदगुरूंची सेवा म्हणजे आपणस जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे त्याचे आपणस वाचन करायचे आहे… जसे तुकाराम गाथा असेल , दासबोध असेल , ज्ञानेश्वरी असेल यांचे आपणस मनसोक्त वाचन करायचे आहे… जेणेकरून आपणस सद्गुरू आपणस जो बोध देऊ इच्छितात तो आपणस समजेल…तोच बोध आपण आपल्या वाचे द्वारे इतरांना सांगू शकता हि देखील सद्गुरूंची सेवा होणार आहे …हि सर्व सेवा झाली कि एक अवस्था अशी येईल कि आपण आपल्या मनाद्वारे… सद्गुरूची मानस पूजा करू… पण हि अवस्था येण्यासाठी आपणस खूप सेवेची भक्ती ची अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक आहे… त्या साठी आपण सदगुरूंच्या प्रत्येक आज्ञा चे पालन करणे आवश्यक आहे… त्यावर आपणस चिंतन मनन करणे आवश्यक आहे…तेव्हाच आपल्याकडून परिपूर्ण अशी पादसेवन भक्ती होईल.
चला आपण सद्गुरू श्री रामदास स्वामींनाच या साठी प्रार्थना करूया

हे समर्था… आज तु आम्हाला पादसेवन भक्ती म्हणजे काय याची ओळख करून दिलीस… खरे तर हे तुम्ही जे काही सांगितले हे वाचन करताना… आम्हाला असे वाटते कि आम्हाला हे समजले आहे… परंतु रोजच्या कर्मात आम्ही आपली हि शिकवण विसरून जातो…पादसेवन भक्ती करायची असेल… त्या भक्ती मध्ये स्थिर होण्यासाठी आपलीच कृपा आवश्यक आहे… हे आई… तुला हीच प्रार्थना आहे कि आमची भक्ती वाढव…आम्हाला आपली पादसेवन भक्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना… धन्यवाद समर्था !!


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...