श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

Nov 18, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपले गजानन महाराज बोलत आहेत – हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही.
श्री गजानन महाराज लीला – श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले… आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार असा विचार श्री बंकटलाल व श्री दामोदर यांच्या मनात आला… श्री महाराज यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे होते परंतु त्यात पाणी नव्हते… तेव्हा श्री दामोदर यांनी श्री महाराजांना विनयपूर्वक विचारले… महाराज आपणस पिण्यासाठी पाणी आणू का ? श्री महाराज यांनी त्यांच्याकडे पहिले आणि हसले… आणि म्हणाले… आपणास आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाणी आणावे… जगाच्या व्यवहारानुसार जेवण केल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे… श्री महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दामोदर घरात पाणी आणण्यासाठी जातात… तिथे गाई… म्हशी.. घोडे तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी पाणी पिण्यासाठी एक हौद होता… श्री महाराज तिथे गळे व त्यांनी तेच पाणी ग्रहण केले… हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्य चकित झाले… दामोदर पाणी घेऊन येऊ पर्यंत श्री महाराजांनी पाणि ग्रहण केले होते… हे सर्व पाहून दामोदर श्री महाराजांना म्हणाले.. श्री महाराज ते पाणी अशुद्ध आहे.. ते पाणी प्राणी पितात… मी तुमच्या साठी माठातील शुद्ध व थंड पाणी घेऊन आलो आहे… तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले… या सर्व व्यवहारिक गोष्टी मला सांगू नका … हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही… पाणी हे पाणीच असते… पाणी आणि पाणी पिणारा वेगळा नाही… श्री महाराज यांची हि वाणी ऐकून बंकटलाल आणि दामोदर दोघेही श्री महाराज यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आले.. परंतु श्री महाराज वायू वेगाने तिथून निघून गेले… बोला श्री गजानन महाराज कि जय !
!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – श्री गजानन महाराज वरील लीलेतून खूपच खोल असा बोध देत आहेत… पहा ना श्री महाराज यांचे जेवण झाल्यानंतर श्री दामोदर यांनी श्री महाराजांना पाणी पिण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले कि जगाच्या व्यवहारा नुसार पाणी पीले पाहिजे… पहा ना यात पहा खूप खोल संदेश आहे… ते तर ब्रम्हांड नायक आहेत तरीही… जगाच्या व्यवहारा नुसार त्यांनी पाणी ग्रहण केले… आपणस सुद्धा संसार करताना… सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे… असे नाही कि फक्त आध्यात्मिकता किंवा संसार करायचा आहे… आपणस सर्व गोष्टीत एकरूपता आणायची आहे… जसे पाणी दुधात एकत्र केले तर दुधाचा रंग धारण करते… म्हणजे ज्यात मिळवले जाते त्याचे रूप धारणा करते… अगदी तसेच आपणस संसारात राहताना आपले कर्म करायचे आहे…एखाद्या कामाची पूर्तता झळाई कि त्यात अडकायचे नाही.. आपणस आपल्या मनाला पाण्याप्रमाणे निर्मळ… शुद्ध बनवायचे आहे… इथे महाराज पाण्याचे महत्व पण सांगत आहेत… पण यावर आपण पुढे चिंतन करूया…

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज आपण आजच्या लीलेला माध्यम करून जो आम्हाला बोध दिलात त्याबद्दल धन्यवाद… पाण्याप्रमाणे आमचे मन सुद्धा शुद्ध करा… निर्मळ करा… या मनावर कायम तुमच्या नामाची जादू असावी… जेणेकरून आम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल… आमच्या मनावरील चुकीच्या धारणा दूर करा… जेणेकरून तुम्ही आम्हाला जे ज्ञान देऊ इच्छिता त्यासाठी आम्ही पात्र बनू… ! … धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद

 


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...