श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ …म्हणजे स्वामी चरणाची विभूती… स्वामी चरणी व वंदन… स्वामी नामाची साधना… स्वामी नामाचे ध्यान… आणि स्वामी चरणाचे  तीर्थ… हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे… त्याला कसलीच भीती भय नाही… या ठिकाणी विभूती म्हणजे आपणस आपल्या नकारात्मक विचारांना हटवून सकारात्मक विचारांची विभूती  मनाला लावायची आहे. नमन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर… पूर्णपणे आपल्या मनास  स्वामी चरणी लीन करायचे आहे… नाम म्हणजे आपणस नामरूपी सेवा रुजू करायची आहे… जेव्हा जेव्हा शकय आहे तेव्हा अखंड स्वामी नाम घ्यायचे आहे… कोणतेही संकट आले तर हृदयातून स्वामी नाम यावे.. इतकी स्वामी नामाची सवय आपणस लावायची आहे… ध्यान हि सर्वोच्च साधना आहे.. रोज थोडा वेळ तरी आपणस ध्यान साधने साठी द्याचा आहे…हे ध्यान आपण स्वामी नामाचे करू शकता.. किंवा आपणस जी ध्यानाची पद्धत सोपी वाटते ते करू शकता… पण ध्यान करावे… तीर्थ म्हणजे या ठिकाणी स्वामी सांगत आहेत अरे जेव्हा तू हि साधना सुरु करशील तेव्हा तुला जो अनुभव येईल तेच तीर्थ असणार आहे.

स्वामीच या पंच प्रानामृतात अनेकदा आपण प्रश्न विचारतो की स्वामी कुठे आहेत.. किंवा आपणस इतर कुणी विचारते कि स्वामी कुठे आहेत… स्वामी कुठे आहेत यांचे उत्तर तर स्वामींनी आधीच दिले आहे – विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ  यात आपणस स्वामी भेटतील.. इथे याचा स्पष्ट अर्थ असा आहे.. जेव्हा आपण आपल्या स्वतः वर काम करू… आपली आंतरिक सफाई होईल तेव्हा आपणस नक्कीच स्वामी कुठे आहेत याची अनुभूती येईल.

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती स्वामी काय आहेत तर स्वामी हे अनुभूती आहेत.. मग स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावे..काही नाही फक्त आपणस वर सांगितल्या प्रमाणे सेवा करायची आहे .. मग अनुभूत येणारच आहे.. हो पण त्या साठी आपणस सेवेत सातत्य असणे गरजेचं आहे. सातत्य असेल तर आपणस प्रचिती येतेच.

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती एकदा आपण सेवेस सुरवात केली कि आपणस अनुभव येतात… पण यात कसे असते आपण स्वामींना आपल्या मनाची चावी त्यांच्याकडे  द्यायची आहे… मग स्वामी महाराज आपला हात धरतात.. स्वामींनी आपला हात धरला असताना आपल्या मनात जर अनन्य भक्ती आणि श्रद्धा असेल तरी.. स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत… फक्त गरज आहे आपल्या सेवा श्रद्धा आणि विश्वासाची.


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...