साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

Oct 31, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता… आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो… कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो… त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे… साडेसाती सुरु आहे… त्याला जर विचारले साडेसाती म्हणजे काय तर तो सांगू शकत नाही.. खरंच साडेसाती म्हणजे काय ? खरंच  साडेसाती म्हणजे अडचण कि आपला परिपूर्ण उत्कर्ष ? आज आपण यावर थोडीशी माहिती घेऊ या… शनी देव हे प्रत्येक राशीतून गोचर भ्रमण करत असतात हा कालावधी अडीच वर्षाचा असतो … म्हणजेच जेव्हा तो आपल्या राशीच्या आधीच्या राशीला येतो तेव्हा आपणस साडेसाती सुरु होते… म्हणजेच आपल्या राशीच्या आधीची रास अडीच वर्ष + आपली रास अडीच वर्ष + आपल्या राशी नंतर ची रास अडीच वर्ष अश्या सर्वांची बेरीज म्हणजे साडेसाती… आता आपणस साडेसाती म्हणजे काय हे समजले असावे.. आता आपणस एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनिदेव हे न्याय प्रिय देव आहेत.. आपण म्हणाल शनीदेव  न्याय प्रिय आहेत… यावर जेव्हा आपण चिंतन मनन करू तेव्हा आपणस अनेक गोष्टींची उत्तरे प्राप्त होतील..आणि नक्की साडेसाती म्हणजे काय हे आपणस समजेल… आपण जे ही  काही काम करता ते प्रामाणिक पणे करत असाल… ते काम  करत असताना कुणाचेही नुकसान आपण करत नाही… मग आपणस किती वाईट वेळ असो.. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे हि शनि देवांची अपेक्षा असते…आपण जर आपले कर्म करत असताना जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असाल तर नक्कीच आपणास आपल्या कर्माचे फळ मिळते… मग तो कालावधी साडेसाती असतो असे म्हणण्यास हरकत नाही… जर आपण आपले कर्म प्रामाणिक पणे करत असाल तर नक्कीच आपणस साडेसाती ची तीव्रता जाणवणारा नाही… आता आपणस कळले असावे न्याय प्रिय शनिदेव आहेत… न्याय प्रिय म्हणजे फक्त चांगले वागणेच न्याय प्रिय आहे का ? खरंतर ज्यांना साडेसाती आहे त्याच्या जीवनाच्या परिवर्तन चा हा काळ असतो… मग हे परिवर्तन चांगले असू शकते वा वाईट असू शकते… चांगले किंवा वाईट हे सर्व आपल्या वर अवलंबुन असते.. आपण आपल्या मनाला सांगितले कि आता माझ्या राशीला साडेसाती सुरु आहे… त्यामुळे मला खूप त्रास होत आहे… हि साडेसात वर्ष कशी जाणार माहित नाही… त्या वेळेस शनिदेवाच्या न्याय प्रिय स्वभावानुसार ते म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होवो… म्हणजेच आपले नकारात्मक मन शनिदेवांची उपासना करण्यापेक्षा त्यांचा उपहास करते..आता तुम्हीच विचार करा.. जर तुमची कुणी टीका केली तर ती तुम्ही सहन करू शकता का ?नाही ना? मग या ठिकाणी आपण न्याय प्रिय  शनी देवांना नाव ठेवतो.. आपले मन पण तेच खरे मानते…  आणि एक म्हण आपणस माहीत असेलच  ती म्हणजे… वैरी न चिंती ते मन चिंती ” या म्हणी प्रमाणे आपणस फळ प्राप्त होतात आणि मग आपण आणखीन नकारात्मक बनून… साडेसाती… साडेसाती… करत त्यात पूर्णपणे फसून जातो…आणि मग सर्व रस्ते आपणस बंद दिसतात आणि खूपच त्रास होतो.. मग आपण म्हणाला काय केले तर खरंच  आम्हाला साडेसाती जाणवणार नाही … आमची प्रगती होईल… खरंतर… साडेसाती म्हणजे आपल्या जीवनाच्या यशाचा राजमार्ग आहे… कोणत्या आईला वा बापाला  वाटते का आपले बाळ मागे राहावे नाही ना… तसेच शनिदेवांना का वाटेल माझी भक्ती करणारे माझे भक्त अधोगतीस जावेत.. नाही ना.. तर मग आजपासून आपणस आपले विचारात  परिवर्तन करायचे आहे.. आपल्या मनाला सांगा हि जी काही  साडेसाती आली आहे ती मला सांगत आहे आता तुझा उत्कर्ष चा काळ सुरु झाला आहे… आजपर्यंत नक्कीच मी माझे कर्म करताना अनेक चुका केल्या असतील… त्या चुका पुन्हा करू नकोस असे शनी महाराज सांगत आहेत…जसे घर बांधताना आधी पाया मजबूत असावा लागतो नाही तर इमारत कोसळू शकते … तसेच हि साडेसाती मला सांगत आहे… बाळा तुझा पाया मजबूत कर म्हणजेच आधी तुझे मन जे आहे ते मजबूत बनव… मन हे तुझ्या जीवनाचा पाया आहे… तो मजबूत झाला कि… मग साडेसाती म्हणजे हि जी काही साडेसात वर्ष आहेत हि.. तुझे जीवन बदलून टाकण्यासाठी आली आहेत… प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे कर … सुरवातीला तुला खूप त्रास होणार आहे कारण… हे काम शाब्दिक नाही तर कार्मिक आहे… प्रत्येक अडचणीला सामोरे जाताना श्री शनिदेवांना धन्यवाद द्या… पहा नक्कीच आपणस आपल्या

जीवनात चमत्कार पाहण्यास मिळतील.. मग कितीही  त्रास होऊ द्या तुमचे अंतर्मनातून एकच नाद येईल तो म्हणजे… धन्यवाद शनिदेव … कोटी कोटी धन्यवाद .

चला आपण सर्व मिळून शनी देवांना प्रार्थना करूया – हे शनिदेव मला माफ करा आजपर्यंत मला असे वाटायचे कि… साडेसाती म्हणजे शनिदेवांची वक्र दुष्टी.. पण मला आज समजले आहे कि साडेसाती म्हणजे माझ्या प्रगती साठी ईश्वराने मला दिलेली एक साद… एक कालावधी ..शनी देव आपल्या मुळेच तर मी जागृत झालो आहे… माझ्याकडून आपणस अपेक्षित असणारी कर्म करवून घ्या… हि साडेसात वर्ष माझे जीवन बदलून टाकणारी ठरावीत… आणि माझे मन सदैव सकरात्मक प्रतिसाद देऊ दे… धन्यवाद शनिदेव आपण मला हि समज  दिलीत त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद ! हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! श्री शनी महाराज कि जय !!


Share
और पढिये !!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...