श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

Sep 26, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय – ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ लागते म्हणजेच ह्रदयात स्वामी विषयी अनन्य भक्ती प्रेम जागृत होते आणि मग त्या आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. आपले जीवन प्रेम आनंद आणि मौन याने भरून जाते.

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय – स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवतात. आपण अनेकदा या गोष्टीची अनुभूती घेतली आहे. अनेकदा आपण अडचणीत संकटात असतो. स्वामी महाराजांना प्रार्थना करतो… ती प्रार्थना करताना आपल्या मनात अनन्य भाव असतो आणि आपण पाहतो कि आपणस व असणारी गोष्टीची प्राप्ती आपणस होते म्हणजेच आपणस अनुभूती येते कि कश्या पद्धतीने स्वामी महाराज आपले प्रारब्ध घडवतात.

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला – स्वामींच्या इच्छे शिवाय परलोक प्राप्ती सुद्धा होत नाही. याची अनुभूती आपणा पैकी बहुतेकांनी घेतला आहे. अनेक व्यक्ती अश्या परिस्थिती मध्ये असतात कि आपणस असे वाटतं असते कि कधी हि हि व्यक्ती परलोकी जाऊ शकते.. अश्या वेळेस आपण सर्व आपल्या भाव भटकी नुसार स्वामी महाराजांना प्रार्थना करतो आणि मृत्यू शय्ये वर असणारी व्यक्ती बरी होते.. म्हणजेच स्वामींच्या आज्ञे शिवाय आपणस परलोक सुद्धा होत नाही.

परलोकही ना भिती तयाला – आता आपणस जरी मृत्यू आला तरी आपण ज्या कोणत्या लोकी जाऊ तिथे सुद्धा आपणस स्वामी कृपेची अनुभूत प्राप्त होते. म्हणजेच आपणास जरी मृत्यू आला तरी आपणस मृत्यू भीती राहत नाही. पहा समजा आपणस कुणी सांगितलें कि तुम्ही उद्या मरणार आहात. अश्या वेळेस आपल्या मनात असंख्य विचार येतात. मला कसे मरण येणार.. मरण इतक्या लवकर नको… काही त्रास होईल का. असं अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण जेव्हा स्वामी सेवेत असतो अन स्वामी कृपेने आपणस आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव हते तेव्हा सर्व प्रकारची भीती नाहीशी होते व आपले मन सांगते. स्वामीच्या इच्छे नुसार होणार आहे. मी कशाला चिंता , भीती बाळगू


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...