“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

Dec 7, 2024 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे काही स्वामी आपणस देणार आहेत त्यात अडचण निर्माण होते.. पहा आपण यासाठी बसप्पा महाराज यांचे जीवन चरित्र पाहू.. बसप्पा महाराज आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती…मात्र त्यांची त्याबाबत कोणती तक्रार नव्हती…ते फक्त स्वामी सेवा करत…आणि आपली कर्म करत होते..न मागता देतात स्वामी…असेच एके दिवशी स्वामी रात्री जंगलात निघतात.. बसप्पा देखील…त्यांच्या बरोबर जातात…काही अंतर गेल्यानंतर बसप्पा यांना साप दिसू लागतात..ते घाबरतात…स्वामी त्यांना म्हणतात..अरे भिऊ नकोस हवे तितके..साप घे… बसप्पा घाबरतात पण…स्वामी चरणी त्यांचा विश्वास दृढ होता…त्यांनी एक साप उचलला आणि आपल्या पिशवीत टाकला….आणि घरी येऊन पाहतात तो काय..सापाचे रूपांतर सोन्यात झालं होते….ही स्वामी ची लीला होती..जर आपण यातून आपल्या जीवनाकडे पाहिले तर..आपणास जाणवते..की आपल्या जीवनात ही अशी संकट रुपी साप येत आहेत..पण जर आपण…धैर्य…विश्वास…स्वामी नाम घेत..जर आपण त्या संकटाला सामोरे गेलो तर..संकट कधी दूर झाले आपणास कळत ही नाही.. हेच आपणास करायचे आहे…संकटाना घाबरायचे नाही… बसप्पा महाराज प्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करत यशाला गवसणी घालायची आहे… धन्यवाद स्वामी…कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...