चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

Jan 14, 2024 | Uncategorized

Share

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो “स्वामी भक्तीत रहावे” स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो शक्य आहे.. प्रत्येक कर्म जेव्हा आपण स्वामी सेवा आहे या भावनेनं करू तेव्हा त्याचा अर्थ आपण स्वामी भक्तीत आहोत.. जसे आपण सकाळी स्वामी नाम घेऊन घरा बाहेर पडलो.. आता आपण २४ तास स्वामी नाम घेऊ शकत नाही आणि स्वामींना ते अपेक्षित नाही.. तर आपण ज्या काही चांगल्या कामासाठी घरा बाहेर पडलो आहोत.. ते काम स्वामींनी मला दिले आहे.. मी ते प्रामाणिकने करणार.. हा भाव ठेवून.. आपण जेव्हा ते काम करतो तेव्हा ते काम म्हणजेच स्वामी भक्तीत राहणे होय..आता इथे थोडी गल्लत होऊ शकते कि स्वामी सेवा म्हणजे आपण पैसे कमवणार नाही का? असे नाही तर आपण जे काम करत आहोत त्यात गुणवत्ता देणे म्हणजे.. स्वामी भक्ती.. जसे आपण चहा चा व्यवसाय करत आहोत.. तेव्हा आपल्या कडे येणार ग्राहक हे स्वामींनी पाठवले आहेत.. त्यांना चांगला चहा देणे हि माझी स्वामी सेवाच आहे.. जेव्हा हा भाव आपल्यात जागृत होईल.. आपण तो आपल्या अंतकरणात कोरू .. त्यावर तसे करू त्यावेळी आपण स्वामी भक्तीतच असतो.. पहा आपण यावर चिंतन मनन करा नक्कीच आपले प्रत्येक कार्य हि स्वामी भक्ती होईल.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. ! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...