दत्त येऊनिया ऊभा ठाकला

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९)

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ,
सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ||

– श्री दत्त महाराजांची आरती
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा पासून श्री दत्त प्रभूंच्या आरती चे कडवे मी म्हणत आहे..आपण ही म्हणत।असाल..पण जेव्हा यावर चिंतन मनन करण्याची आज वेळ आली.. काहीच चिंतन झाले नाही..मग स्वामीं मार्ग दाखवतात.. आणि एका क्षणात स्वामीं नी एका स्वामीं भक्ता मार्फत उत्तर दिले..सर्व प्रथम त्यांना धन्यवाद..ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली असे म्हंटले जाते..या बाबत आपणस माहिती असेल तर आपण सांगावे..भाव इतका खोल आहे की..तो शब्दांत नाही..हे आरतीचे कडवे म्हणजे अनुभव.. दत्त येऊनिया उभा ठाकला..इथे दत्त म्हणजे..परमेश्वराची अनुभीत…आपण म्हणतो संकटात कुणी मदत केली की..दत्ता सारखा उभा राहिलास..म्हणजेच आपल्या ध्यानी मनी नसताना कुणी तरी मदत करते..स्वामीं अनुभूती सुद्धा अशीच आहे..कोणतीच अपेक्षा न करता आपण जेव्हा स्वामीं सेवा करतो..नाम घेतो..नामातून आपण सहज ध्यानात प्रवेश करतो..ध्यानात कधी आपणस स्वामीं अनुभव येतो..आपणस ही कळत नाही..या अनुभूती मध्ये.. फक्त स्वामीं आणि आपणच असतो..या अवस्थेत जेव्हा आपण असतो..ती अवस्था म्हणजे स्वामीं च्या प्रसन्न मुद्रेची अवस्था..स्वामीं यात आशीर्वाद देतात..ही अवस्था म्हणजे.. जन्म आणि मृत्यू च्या पली कडची अवस्था..स्वामीं महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला ही अवस्था मिळावी असे स्वामीं आईचे नियोजन आहे..फक्त गरज आहे..अखंड स्वामीं नाम सेवेची..स्वामीं भक्तहो..चला आपण सर्व मिळून स्वामींना प्रार्थना करूया..हे समर्था..आज या आरतीतील भावाला निमित्त करून आमच्यात जो भक्ती भाव जागृत केलास त्याबद्दल धन्यवाद.. तुझी तर इच्छा आहे की प्रत्येकाला स्वामीं तत्वाची अनुभूती द्यावी..परंतु माझे मन त्यात बाधा निर्माण करते..कृपा।कर माझ्या मनाची चावी तुझ्याकडे घे.. आमच्याकडून अखंड स्वामीं नाम सेवा..अखंड ध्यान सेवा करून घे…कारण तुझ्या इच्छे शिवाय हे होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..धन्यवाद चिंतन मनन करून घेतल्याबद्दल.. धन्यवाद प्रार्थना करून घेतल्याबद्दल..!


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...