स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५)

कलियुगी दिवसेंदिवस ।
वाढेल स्वामी महिमा विशेष ।
ऐसे बोलले स्वामीदास ।
येथे विश्वास धरावा ॥

– स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज एक ओवी आपणस येईल..त्यावर चिंतन मनन करा पहा..अनेक प्रश्नांची उत्तरे स्वामीं आपणस देतात..!
वरील ओवीत स्वामीं आपणस विश्वास हा गुण आपल्यात वाढवण्यास सांगत आहेत.. विश्वास कसा असावा..लहान बालकाचा आपल्या आई वडिलांवर विश्वास असतो..काही झाले तरी आपले आई बाबा आहेत..या विश्वासात कुठेही शंका..अविश्वास नसतो..असतो १०० % विश्वास..स्वामीं सेवेतही.. आपला विश्वास कसा आहे त्या नुसार आपणस फळ मिळते…इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात असावी..विश्वास व आपण करत असणारे कर्म हे प्रामाणिक।असावेत..म्हणजेच आपले कर्म हे स्वामींच्या विश्वासास पात्र असेच असावे..म्हणजेच स्वामीं आपणस आज विश्वास हा गुण वाढवण्यास सांगत आहेत..समर्था आमच्यातील विश्वास हा गुण वाढव..धन्यवाद समर्था..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..!

 


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...