देहभान हरपणे म्हणजे काय ?

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)*

*आजचे चिंतन-मनन*

देहाचें भान न उरो !
गळून जाऊ दे अहंपणा !
कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !!

www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे…देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण एखादे काम करत असू तर आपणस त्या कामात यश नक्की प्राप्त होते..हा नियम आध्यत्मिक बाबतीत ही लागू होतो..पण इथे एक गल्लत आपली होऊ शकते…अन्न पाण्याचा त्याग करणे..असा अर्थ नसून.. स्वामीं नाम घेताना आपणस इतर गोष्टीचा त्याग करता यावा..जसे स्वामीं नाम घेताना आपणस झोप येते..कंटाळा येतो..या गोष्टींवर आपणस मात करण्याची समज स्वामीं आपणस देत आहेत.. पहा आपणस स्वामीं नाम घेताना झोप येते किंवा कंटाळा येतो..मग हे असे का होते यावर आपणस कार्य करायचे आहे..पहा जेव्हा आपण यावर काम करू तेव्हा आपला देह स्वामीं नाम सेवेस तयार होणार आहे..म्हणजेच आपल्या देहाचे भान हरपेल.. यासाठी मनाला आणि शरीराला स्वामीं नाम सेवेस बसवा..मन नको म्हणेल..ते का नको म्हणता आहे..त्याचा अभ्यास करा..आपल्यातील ते दोष दूर करा..नक्कीच आपणस यश येईल..गळून जाऊ दे अहंपणा ! अध्यात्म असो वा व्यक्तीगत जीवन यात मोठा अडसर कोणता असेल तर..तो आहे..अहंपणा..पहा मी इतकी सेवा करतो..सेवा कोण करतो मी..मी इतके देवाचे करतो…म्हणजेच अहंपणा..अहो त्याच्या इच्छे शिवाय आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही..स्वामीं सेवा किंवा इतर गोष्टी काय करणार..इथं असा गैरसमज करून घेऊ नका मी काहीच कर्म करणार नाही..असे नाही सर्व काही करा पण आपल्यातील अहंपणा सोडा..कर्म करून विसरून जा..म्हणजेच स्वामीं सेवा केली असे म्हणण्या ऐवजी म्हणा…” स्वामीं नी सेवा करून घेतली” पहा कसा हळूहळू अहंभाव गळून पडेल..कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !! पहा जर आपले चित्त शुद्ध नसेल तर आपणस अडचणी येतात..पहा दोन भांडी आहेत..दोन्ही स्वच्छ दिसतात..एक भांडे असे आहे त्यात नकळत थोडा भांडे घासण्याचा साबण राहिला आहे..पहा काय परिणाम होईल..जर आपल्या दिसले तर आपण ते स्वच्छ करू..जर ते स्वच्छ नाही केले तर त्यातील दूध खराब होईल..त्याच प्रमाणे आपण जर आपले चित्त शुद्धी केली नाही तर…आपण कोणतेच कार्य व्यवस्थित करू शकता नाही..म्हणून रोज प्रत्येक क्षणी चित्त शुद्धी वर लक्ष ठेवा..आपले चित्त स्वामीं चरणी लीन व्हावे यासाठी प्रार्थना करा..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नक्कीच यश देतील..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...