क्षमा म्हणजे काय ?

Jan 31, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)*

*आजचे चिंतन-मनन*

जया अंगी क्षमा भाव करुणेचा !
ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !!
म्हणोनि चुकलेल्या माफ करावे !
चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी म्हणतो..कुणी सॉरी म्हंटलं की..इंग्रजीत आपण It’s ok किंवा अजून काही म्हणतो..इतकाच अर्थ आहे का क्षमा या शब्दाचा..यांवर आपण चिंतन मनन करणे खूप आवश्यक आहे..जो पर्यंत आपण क्षमा या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही तो पर्यंत क्षमा हा गुण आपण आपल्यात धारण करू शकत नाही..जो पर्यंत हा गुण धारण करत नाही..तो पर्यंत स्वामीं च्या जवळ आपण पोहचू शकत नाही..पहा आपण आपल्याकडून काही चुकी झाली तर आपण।ह्रदयातून माफी मागतो का ? हा प्रश्न आज स्वतः ला विचारायचा आहे? उत्तर हो आले तर खूपच छान..नाही आले तर..यांवर चिंतन करा असे का होत आहे.. आता काही म्हणेल मी सर्वांची माफी मागू शकतो..सर्वांना माफ ही करू शकतो पण एका व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही..याचाच अर्थ आपल्यात क्षमा हा गुण अजून अवगत झाला नाही..पहा जर आपण यात व्यक्ती नुसार बदल केला तर आपण कधीच कुणालाच माफ करू शकणार नाही.. पहा आज पर्यंत आपण ही अनेक चुका केल्या असतील..करत ही असतो..आपल्याला आपल्या आई वडिलांनी माफ केले की नाही.. आपण आपल्या मुलांना माफ करतो की नाही..मग आपण सर्वांना माफ का नाही करू शकत..आपले चुकत असेल..आपले चुकले असेल तर आपण माफी का नाही मागत..कारण आपल्यातील अहंकार जागृत आहे.. जर आपल्यात अहंकार असेल तर आपण स्वामींच्या जवळ कसे जाणार..जाऊच शकत नाही..म्हणून आज या क्षणापासून हा गुण धारण करा..त्यावर काम करा..पहा कसे छान वाटते..इथे आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःला ही माफ करा..कारण अनेकजण स्वतःला माफ करत नाहीत..मनातल्या मनात कुढत राहतात..तुमच्याकडून चुकी झाली.. झालेली चुकी ची माफी मागा..नाही मागू शकत स्वामीं समोर मागा.. पहा किती मोकळे।मोकळे वाटते..क्षमा करणे व क्षमा मागणे हे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे..या मार्गाचा जो अवलंब करतो तो स्वामीं चा सदैव प्रिया भक्त होतो…आपल्या सर्वांना स्वामीं चा प्रिय भक्त व्हायचे आहे ना! मग एकच उपाय..क्षमा करा..क्षमा मागा..चला।आजपासूनच या सेवेला सुरवात करूया..स्वामींच्या जवळ रोज क्षमा प्रार्थना करूया..हे समर्था मला माफ..आज पर्यंत क्षमा मागितली नाही त्याबद्दल माफ कर…आमच्यात क्षमा हा गुण वाढव..आम्हाला सर्वांना माफ करण्याची शक्ती दे..समज दे..आम्हाला स्वतःला माफ करण्याची समज दे..आज पर्यंत आमच्याकडून जाणते..अजाणतेपणी कुणाचेही मन दुखावले गेले असले तर आम्हाला माफ कर..आमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल आदर भाव..प्रेम निर्माण कर..हे तुझ्या कृपे शिवाय शकय नाही..कृपा कर.. ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...